महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांची मोठी वाढ, पूण्यात एकाच दिवशी साडेचार हजार रूग्ण आढळले....
सातारा जिल्ह्यात 47 बाधितांची वाढ ...
कराड दि.26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 47 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 198 झाली असून सध्या 40 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 16 गंभीर रुग्णाचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-2, कराड-7, खंडाळा- 2, खटाव- 2, कोरेगाव-14, माण-3, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-4, सातारा-10, वाई-0, इतर 2 असे 47 बाधितांची वाढ झाली आहे.
नमूने-चाचणी- 744 (एकूण-26 लाख 3 हजार 706)
आज बाधित वाढ- 47 (एकूण-2 लाख 79 हजार 816)
आज कोरोनामुक्त- 53 (एकूण-2 लाख 72 हजार 881)
आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 705)
सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-198
गंभीर रुग्ण--16
रूग्णालयात उपचार -40
महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 2 हजार 135
आज कोरोनामुक्त-2 हजार 565
आज मृत्यू- 12
सध्या उपचारार्थ रूग्ण- 14 हजार 92
देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 14 हजार 830
आज कोरोनामुक्त- 18 हजार 159
आज मृत्यू- 36
सध्या उपचारार्थ रूग्ण- 1 लाख 47 हजार 512
कोविड लस अमृत महोत्सव...
केंद्र सरकारकडून ''कोविड लस अमृत महोत्सव'' अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे.सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत लस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्वांना हा बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी "कोविड लस अमृत महोत्सव" राबवण्यात येणार आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, हा त्यामागील मुख्य हेतू असून या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.कराडमध्ये टाऊन हाॅल येथे तर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सूरू आहे.




Comments
Post a Comment