आ. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन....
आ. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन....
कराड दि.27 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री व सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या २९ जुलै २०२२ रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक झाड व मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्येकी ३० फळझाड रोपांचे वाटप, दिनांक २९ जुलै रोजी दुपारी ४.०० वा.पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.निलेशजी लंके यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, वनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन सौ.लक्ष्मी गायकवाड, सर्व संचालक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रहिमतपूर येथे रक्तदान शिबीर व मियावाकी प्रकल्पांतर्गत पंधरा हजार रोपांची लागवड आणि धामणेर येथे 50 लोकांचा पोस्ट खात्याचा विमा उतरवण्यात येणार असून वृक्षारोपण करण्यात आहे. तसेच बनवडी, कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाली, चोरे, अतित, नागठाणे, पुसेसावळी, तारगांव, वाठार कि. ओगलेवाडी, करवडी, आदी गावांसह कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमध्ये देखील वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Comments
Post a Comment