कोयना पाणलोट क्षेत्रात नवजा येथे पावसाचा जोर, कोयनेत 0 मि.मी पावसाची नोंद

 


कोयना पाणलोट क्षेत्रात नवजा येथे पावसाचा जोर, कोयनेत पावसाची उघडीप....

कराड दि.27 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत केवळ 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गत महिनाभरातील पावसाची ही सर्वात कमी नोंद आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 0 मि.मी तर नवजा येथे 12 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 10 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 25.41 % टक्के पाणीसाठा कमी आहे.

सध्या कोयना धरणात 64.26 टीएमसी पाणीसाठा असून धरण 61.05 % टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.29 टीएमसी पाणीसाठा धरणात झाला आहे. धरणातील आवक ही कमी झाली असून सध्या 5 हजार 510 क्युसेक आवक सुरू आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून अजूनही 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 91 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 86.46% भरले होते.    

सातारा जिल्ह्यात आज मोठे प्रकल्प असणाऱ्या क्षेत्रात कोयना, धोम बलकवडी, तारळी या प्रकल्पा क्षेत्रात 0 मि.मी, पावसाची नोंद झाली आहे. धोम-2 मि.मी, कण्हेर-3 मि.मी,, उरमोडी-2 मि.मी, त्याचबरोबर मध्यम प्रकल्प असणाऱ्या क्षेत्रात येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, मोरणा, उत्तरमांड, कुडाळी , कुडाळी , वांग मराठवाडी परिसरात ही 0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नागेवाडी-2 मि.मी., महू-3 मि.मी. हातगेघर-3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना 2100, धोम बलकवडी 677, कण्हेर 0, उरमोडी 0, तारळी 435, मोरणा 540, उत्तरमांड 92, महू- 100 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक