कराडात नाग पकडून त्याच्यासोबत खेळ करणार्या सर्पमित्रास अटक...
कराडात नाग पकडून त्याच्यासोबत खेळ करणार्या सर्पमित्रास अटक...
कराड दि.24 (प्रतिनिधी) नागा सोबत स्टंट/खेळ करून त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केल्याप्रकरणी वनविभागाने आज ओगलेवाडी येथील सर्पमित्रास ताब्यात घेऊन त्याच्यावरती गून्हा दाखल केली आहे. ओंकार रामचंद्र साळुंखे (वय 19) रा. ओगलेवाडी असे या सर्पमित्राचे नाव आहे. त्याच्यावरती वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाग पकडून त्याच्यासोबत खेळ करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याची माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने वनविभागाने तपास केला असता ओंकार रामचंद्र साळुंखे या युवकाने सोशल मीडियावरील इंस्टाग्राम ॲपवर नाग पकडून त्याच्यासोबत खेळ खेळून त्याचा व्हिडिओ तयार करून अपलोड केला होता. त्या अनुषंगाने सदर प्रकारातील युवकाची माहिती मिळाल्यानंतर त्या युवकास ताब्यात घेण्यात आले.
नाग हा वन्यजीव संरक्षण देण्यात आलेला प्राणी आहे. याप्रकरणी सदर युवकावर वनक्षेत्रपाल कराड यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आज गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल बाबुराव कदम यांनी केला आहे. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे सदर गुन्हे कामे तपासात सहकार्य लाभले. वनकर्मचारी वनरक्षक रमेश जाधवर, सचिन खंडागळे, भारत खटावकर यांनी तपासामध्ये सहभाग घेतला.

Comments
Post a Comment