कराडात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी अभिवादन...
कराडात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी अभिवादन...
कराड दि.26 (प्रतिनिधी) जातीभेद, अस्पृश्यता व अनिष्ट रुढी-परंपरांच्या उच्चाटनासाठी तसेच स्त्री-शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. आपल्या आधुनिक विचारांनी त्यांनी समाजात क्रांती घडवून आणली. समतेवर आधारित समाजरचनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी येथिल त्यांच्या स्मारकास जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, विविध पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ पो.नि बी.आर.पाटील, मंडलाधिकारी महेश पाटील, माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कराड शहरातील ओबीसी समाजाच्यावतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराजाना अभिवादन करताना भानूदास वास्के, दत्ता तारळेकर,विनायक गायकवाडसर, विश्वास मोहिते व इतर...

Comments
Post a Comment