राज्यात बी ए-5 आणि बी ए-4 व्हेरीयंटचे आणखी 23 रुग्ण आढळल्याने खळबळ.......
सातारा जिल्ह्यात 2 बाधितांची वाढ झाली...
कराड दि.25 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार 2 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे, तर आज एक ही कोरोनामुक्त झाला नाही. जिल्ह्यात काल 117 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 51 रुग्ण आहेत. तर 1 जण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
खटाव-1 सातारा-1...
राज्यात 1 हजार 728 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून आज राज्यात 1 हजार 728 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 2 हजार 708 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील असून आज 840 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 24 हजार 333 उपचारार्थ रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईम मध्ये आहेत. मुंबईमध्ये 12 हजार 43 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5 हजार 836 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बी ए-5 आणि बी ए-4 व्हेरीयंटचे आणखी 23 रुग्ण...
राज्यात पहिल्यांदाच बीए-5 व्हेरीयंटचे 17 आणि बीए 4 व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 11 पुरूष आणि 12 स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 49 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 28, नागपूरमधील चार आणि ठाण्यातील दोन रुग्ण आहेत.
देशात 15 हजार 940 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
भारतात गेल्या 24 तासात 15 हजार 940 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 12 हजार 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 91 हजार 779 रुग्ण ॲक्टिव आहेत. आज 20 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

Comments
Post a Comment