सौ. ताराबाई मोहिते विद्यालय व छ. संभाजी विद्यालयाचा निकाल 100 टक्के...
शिवनगर : सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय आणि छत्रपती संभाजी विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार करताना शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले....
सौ. ताराबाई मोहिते विद्यालय व छ. संभाजी विद्यालयाचा निकाल 100 टक्के...
कराड, दि.25: रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय आणि शिवनगर येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या दोन्ही शाळांमधील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयाच्या एकूण ८१ विद्यार्थ्यांपैकी ४५ जणांनी विशेष प्राविण्य मिळविले असून, २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील कु. अनुष्का अनिल शेळके, वेदिका महादेव सपकाळ, संजीवनी संजय लोकरे, आदिती विजय साळुंखे, मिजबा ईस्माईल सय्यद यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक मिळविले आहेत.
छत्रपती संभाजी विद्यालयाच्या एकूण १३८ विद्यार्थ्यांपैकी ६७ जणांनी विशेष प्राविण्य मिळविले असून, ५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील अवधूत वसंत औताडे, नयन सुरेश निकम, विभावरी हणमंत थोरात, वैष्णवी निवास सपकाळ, प्रणय विशाल बेले, नेहा राजकुमार पवार यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक मिळविले आहेत.
याप्रसंगी सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पाटील, पर्यवेक्षक भीमराव जमदाडे, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. दमामे, पर्यवेक्षक अर्जुन पवार यांच्यासह दोन्ही शाळांमधील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment