देशात 100 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण वाढ, एका दिवसात 17 हजार 336 नवीन कोरोना बाधित......
जिल्ह्यात 9 बाधितांची वाढ झाली...
कराड दि.24 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार 9 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे, तर आज 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात काल 531 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 49 रुग्ण आहेत. तर 1 जण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पाटण-1, फलटण-1, सातारा-6, वाई-1...
राज्यात 4 हजार 205 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून आज राज्यात 4 हजार 205 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 3 हजार 752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील असून आज 1 हजार 898 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 25 हजार 317 उपचारार्थ रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईम मध्ये आहेत. मुंबईमध्ये 14 हजार 614 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5 हजार 999 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बी ए.5 व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण...
भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे. ही 27 वर्षांची महिला असून तिचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे. 19 जून रोजी कोविड बाधित आलेल्या या रुग्णाला सुरुवातीला सौम्य लक्षणे होती. सध्या ती घरगुती विलगिकरणात असून पूर्णपणे लक्षणे विरहित असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (ABP)
देशात 17 हजार 336 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
भारतात गेल्या 24 तासात 17 हजार 336 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 10 हजार 972 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 83 हजार 990 रुग्ण ॲक्टिव आहेत. आज 14 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

Comments
Post a Comment