सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात मोठी कपात...
पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार तर गॅसवर सबसिडी मिळणार...
दिल्ली दि.21-केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरील 8 रुपये तर डिझेलवरील 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.शिवाय 12 घरगूती गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रूपये सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होईल.

Comments
Post a Comment