पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून लोककलावंतांची विचारपूस....
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून लोककलावंतांची विचारपूस....
कराड दि.23-करवडी ता.कराड येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमप्रसंगी राज्यभर लोकप्रिय असलेल्या लोककलावंत श्रीमती मंगला बनसोडे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली, यावेळी ना. पाटील यांनी त्यांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली व शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या काळात इतर क्षेत्राप्रमाणेच लोककलावंतांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता, अशा परिस्थितीतदेखील राज्यातील महाविकास आघाडी सरकार कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, भूस्खलन होऊन जीवित हानी झाली, त्यावेळी देखील ना. पाटील यांनी संवेदनशीलता दाखवून, 4-5 किलोमीटरचा पायी चिखल तुडवत घटनास्थळी भेट देऊन पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकत्व सिध्द केले.
आता परिस्थिती पूर्वपदावर येवू लागली आहे. परंतु कोरोना महामारीच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार कलावंताचे मागे खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल श्रीमती मंगला बनसोडे यांनी ना. पाटील व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले, व कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान लोककलेच्या माध्यमातून करवडी या गावाचा लौकिक राज्यभर वाढविल्याबद्दल श्रीमती मंगला बनसोडे यांचा ग्रामस्थांच्यावतीने ना. बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते खा. श्रीनिवास पाटील यांचे अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी प.स.सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (काका), राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे (माई), कराड उत्तर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव, शंकरराव खापे, युवा नेते सागर पाटील (दादा), माजी नगरसेवक सौरभ पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सौ.शारदा पाटील, रामदास पवार, दाजी पवार, चंद्रकांत कदम, विठ्ठल स्वामी महाराज, किशोर पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, उत्तमराव पिसाळ, कृष्णत चव्हाण, जी.व्ही.पिसाळ, संजय पाटील, नितीनकुमार बनसोडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment