केंद्रानंतर राज्याकडून ही सामान्य जनतेला दिलासा;इंधनाचे दर केले कमी...
केंद्रानंतर राज्याकडून ही सामान्य जनतेला दिलासा;इंधनाचे दर केले कमी...
मुंबई दि.22-केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेत काल पेट्रोल 8 रूपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त केल्यानंतर आज महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल डिझेल वरील कर कमी करत पुन्हा एकदा राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. राज्य सरकारने मूल्यवर्धित करात घट करण्याचा निर्णय घेतल्याने आता इंधनाच्या दरातही घट झाली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपया 44 पैशांनी घट झाली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 2500 रुपये कोटींचा भार पडणार आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारवर इंधनाच्या दरात कपात करण्याचा दबाव वाढला होता तसेच राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्य सरकारने दर कमी केल्याने महागाईने पिचलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments
Post a Comment