Posts

अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
  अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड, दि. 30 : - आ. अतुलबाबा भोसले हे विकासाचे व्हिजन असलेले युवा नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे भविष्यातील मोठे नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांची क्षमता पाहता त्यांना मोठमोठ्या नेत्यांकडून घेरण्याचे षडयंत्र आखले जात आहे. मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. हे चक्रव्यूह यशस्वीपणे भेदू, मी त्यांच्या पाठीशी आहे. अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील, असा दृढ विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  येथील शिवतीर्थ दत्त चौकात भारतीय जनता पार्टीच्या कराड व मलकापूर नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, नीता केळकर, भरत पाटील, मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुहास जगताप, कराड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर व मलकापूरचे तेजस सोनवणे, शारदा जाधव, म...

कराड शहरात रविवारी भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा

Image
कराड शहरात रविवारी भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा कराड, दि. 29 - कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड शहरातील दत्त चौकात रविवारी (ता. ३०) दुपारी २ वाजता भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रचारतोफ धडाडणार आहे. कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशावेळी भाजपाने थेट कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा घेत निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ना. फडणवीसांचे कराडमध्ये आगमन होणार असल्याने, नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कराड–मलकापूर क्षेत्रासाठी प्रस्तावित विकास आराखडे आणि आगामी योजनांबाबत मुख्यमंत्री काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, अण्णासाह...

कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा; ना. एकनाथ शिंदे

Image
  कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा; ना. एकनाथ शिंदे भर सभेत राजेंद्रसिंह यादव यांनी सुचवलेल्या विविध विकास कामांना निधी जाहीर कराड, दि. 28 (प्रतिनिधी)  कराड शहराच्या विकासाचा झेंडा हाच यशवंत व लोकशाही आघाडीचा अजेंडा असून या आघाडीने समोरच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  कराड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशवंत व लोकशाही आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकशाही आघाडीच्या अध्यक्ष जयंत पाटील तसेच यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव त्याचप्रमाणे माजी मंत्री बाळासाहेब पाटील व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 'विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय नारळ', असे सांगत कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा, असे आवाहन करत कराडच्या विकासासाठी जेवढा लागेल तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही ही या प्रचार सभेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याच वेळी ...

मलकापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : ना. मकरंद पाटील

Image
  मलकापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : ना. मकरंद पाटील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प – मलकापूरचे पालकत्व स्वीकारल्याची घोषणा कराड, दि. 28 - मलकापूर शहराच्या विकासासाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ठाम ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली. “विरोधक काहीही बोलोत, पण राज्याचे अर्थखाते आपल्या पक्षाकडे आहे. मलकापूरसाठी निधीचा पाऊस पाडू,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मलकापूरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याबरोबर शहराचे पालकत्व स्वतः घेत असल्याची घोषणा करून सभा दणाणून सोडली. मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबा ठा) आणि समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला उदयसिंह पाटील-उंडाळकर, डॉ. सुधीर जगताप, बाळासाहेब सोळसकर, राजेश पाटील- वाठारकर, सुनील पाटील, इंद्रजीत चव्हाण, अजित पाटील-चिखलीकर, संजय देशाई, प्रा. धनाजीराव काटकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, प्रदीप पाटील, सविनय कांबळे, नगराध्...

कराड शहराला परत विकासाच्या रस्त्यावर आणण्यासाठी काँग्रेसलाच संधी द्यावी; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Image
कराड शहराला परत विकासाच्या रस्त्यावर आणण्यासाठी काँग्रेसलाच संधी द्यावी; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 27 - कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्र. 5 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कोपरा सभा पार पडली. कराड शहराला गेली अनेक वर्षे ठेकेदारांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ही निवडणूक निर्णायक असल्याचे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. या वेळच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पहिल्यांदाच कराड नगरपालिकेत हाताच्या चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत. या आधी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढविली जात होती.  प्रभाग क्र. 5 मधील काँग्रेसच्या अनुभवी उमेदवार अर्चनाताई पाटील या याआधी नगराध्यक्षा राहिलेल्या असून विकासकामांचा ठसा उमटविणाऱ्या लोकप्रिय नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत पक्षाने तरुण आणि तडफदार उमेदवार योगेश लादे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उभे केले आहे. अनुभवी नेतृत्व आणि उत्साही युवकशक्ती अशी भक्कम शक्ती या प्रभागात उतरवली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी बोलतान...

मलकापुरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीची उद्या प्रचार सभा

Image
मलकापुरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीची उद्या प्रचार सभा कराड, दि. 28 - मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार, दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता मलकापूर येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. नामदार मकरंद पाटील (आबा), सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई हे प्रमुख उपस्थित म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, राजेश पाटील वाठारकर, सुनील पाटील, अॅड. आनंदराव पाटील, इंद्रजीत चव्हाण,अजित पाटील चिखलीकर,प्रा. धनाजीराव काटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर्यन सविनय कांबळे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष या आघाडीचे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणा...

कराड नगर परिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांचे चिन्ह वाटप

Image
कराड नगर परिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांचे चिन्ह वाटप जाहीर कराड, दि. 26 - येथील पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात नगराध्यक्ष पदाचे ९ व प्रभाग १ ते १५ प्रभागातील एकूण १०९ उमेदवारांना निवडणूक निरीक्षक ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी अधिकृत चिन्ह वाटप करून यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते. कराड नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या ९ उमेदवारांचे चिन्ह वाटप जाहीर करण्यात आले, ते पुढील प्रमाणे, झाकीर पठाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) हात, विनायक पावसकर (भाजपा),कमळ, इम्रान मुल्ला (बसपा) हत्ती, राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी) नारळ, रणजीत पाटील (अपक्ष) हीरा, गणेश कापसे (अपक्ष) रोड रोलर, श्रीकांत घोडके (अपक्ष) बॅट, शरद देव (अपक्ष) कपबशी बापू लांडगे (अपक्ष) गॅस सिलेंडर. 109 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे चिन्ह वाटप असे  प्रभाग १ अ - सुरेखा काटकर- कमळ, रूपाली माने ...