Posts

कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे.

Image
कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे. कराड बार असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्षांसह 20 माजी अध्यक्षांचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मतदान करण्याचे आवाहन . कराड, दि. 16 (प्रतिनिधी)  आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार म्हणून निवडून दिले तर आपण महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री निवडून देऊ. विरोधी उमेदवार हे गेली अनेक वर्ष राजकीय जीवनात असून त्यांची राजकीय कार्यकीर्द आपल्यासमोर आहे. त्यांनी सातत्याने केलेल्या पक्षांतरामुळे राजकीय विश्वासार्थता गमावली आहे. या उलट उत्तुंग राजकीय कारकीर्द, धोरणात्मक दृष्टी यामुळे कराड जिल्हा होऊन कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच असल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आपले अमूल्य मत द्यावे असे आवाहन कराड बार असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष एड. एम टी देसाई यांच्यासह वीस माजी अध्यक्षांनी केले आहे.  यावेळी विद्यमान अध्यक्ष एड. एम टी देसाई, सयाजीराव पाटील, प्रतापराव जानुगडे, मानसिंगराव पाटील, अधिकराव पाटील, बबनराव जाधव, दिलीप पाटील, चंद्रकांत कदम, दादासाहेब जाधव, प्रकाशराव चव्हाण, शिवाजीराव निकम, सतीशर

अखिल भारतीय मराठा महासंघाचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा

Image
कराड : येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा देताना पदाधिकारी... अखिल भारतीय मराठा महासंघाचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा कराड, दि. (प्रतिनिधी) : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले. मनोज जरांगे - पाटील यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मराठा समाजाने पाठिंबा दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे - पाटील, सुरज जाधव, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष युवराज कुराडे - पाटील, कराड शहराध्यक्ष संदीप काळे, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय शिंदे, अमर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मराठा समाजाबद्दल त्यांची भूमिका स्

मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार;डॉ. अतुलबाबा भोसले

Image
मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार;डॉ. अतुलबाबा भोसले कराड, दि. 16 (प्रतिनिधी) कराडमधील स्थानिक भूमिपुत्रांना तसेच युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प माझा आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठं मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिले.  विंग येथे आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, सयाजी यादव, जयंवत माने, महादेव पाटील, हेमंत पाटील, राजेंद्र खबाले, आण्णासो कचरे, विकास माने, शिंदेवाडीचे सुरेश शिंदे, सचिन पाचूपते, हेमंत पाटील, विकास खबाले, बंडा खबाले, संजय खबाले,आबासो खबाले, अमोल पाटील, भिमराव कणसे, धनाजी कणसे, शिवाजी पाटील, संदीप माळी, सचिन नलवडे, श्रीरंग नलवडे, सुरेश खबाले, संभाजी पाटील, विकास होगले, नंदकुमार कडव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.,अतुलबाबा भोसले पुढे म्हणाले, विंग गावाला 13 कोटी निधी दिला आहे. अनेक काम पूर्ण झाली आहेत. गावातील मूलभूत प्रश्न सोडवले जातील जात आहेत. विंग गावाने

महाविकास आघाडीच्या युवक मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद....

Image
  कराड : येथील युवक मेळाव्यात बोलताना उदयसिंह पाटील - उंडाळकर... भाजपने युवकांच्या मनात न्यूनगंड निर्माण केला;उदयसिंह पाटील - उंडाळकर कराड, दि.15 (प्रतिनिधी) : गेली ८ ते १० वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. भाजपने दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले. राज्यात व देशात हेट ऑब्जेक्ट पसरवत संभ्रम केला. देशातील युवकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करून त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी केले.  कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, बाळासाहेब मोहिते, ज्ञानदेव राजापूरे, अक्षय सुर्वे, माजी नगरसेवक अशोक कोळी, रमेश वायदंडे आदीसह मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसने 60 वर्षात विकास केला नाही ते दक्षिणेत काय करणार...

Image
काँग्रेसने 60 वर्षांत काय विकास केला; देवेंद्र फडणवीस यांची टीका... कराडला अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ महायुतीची विराट सभा  कराड, दि. 15 (प्रतिनिधी) या देशात गेली 60 वर्ष  काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी नेमका काय विकास केला, हे सांगावे. तीच स्थिती कराड दक्षिण मध्येही आहे. कराड दक्षिण मध्ये आनंदराव चव्हाण, प्रेमिलाकाकी चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चव्हाण कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधित्व असताना त्यांनी कराड दक्षिणसाठी काय केले. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे प्रचारात त्यांच्याकडे सांगायला विकासकामांचे मुद्देच नाहीत, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली केली.  कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भगवंत खुबा, खा. उदयनराजे भोसले, जेष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  भाजप - महायुती सरकारने केल

विकासाचे व्हिजन असलेल्या अतुलबाबांना विधानसभेत पाठवा;डॉ. प्रमोद सावंत

Image
विकासाचे व्हिजन असलेल्या अतुलबाबांना विधानसभेत पाठवा;डॉ. प्रमोद सावंत कराड दि. 14 (वार्ताहर) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणते ही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नाही. त्यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करून डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.   डॉ. सावंत म्हणले, देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली या 60 वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा

Image
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची उद्या मलकापुरात जाहीर सभा कराड, दि. 14 (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मलकापुरातील बैल बाजार रोडवरील श्री गणपती मंदिरामागील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे.  विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा – महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेत, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून प्रचाराचे रान चांगलेच तापविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतीच विंग (ता. कराड) येथे केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची अलोट गर्दीत जाहीर प्रचार सभा पार पडली. त्यानंतर आता मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजता उपमुख्यमंत