Posts

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड आणि माय कन्सोल यांच्यात सामंजस्य करार...

Image
  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड आणि माय कन्सोल यांच्यात सामंजस्य करार... कराड दि.31-:- येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पर्यावरणीय शाश्वतता वाढीस लावणे तसेच हरित उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने लंडन युनायटेड किंगडम येथील पर्यावरण, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील कंपनी माय कन्सोल यांचे सोबत नुकताच सामंजस्य करार केला. महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग यांचे धोरण नेहमीच पर्यावरण पुरक असुन त्यांचेकडुन संस्थेला पर्यावरणाच्या जागरूकतेबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देताना मोरेश्वर भालसिंग म्हणाले की "शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात भरीव वाढ व जागरूकता वाढवणे तसेच पर्यावरण पूरक महाविद्यालयीन आवर तयार करणे, पर्यावरण पूरक घटकांचा अभ्यासक्रमात सहभाग करणे, उद्योगाकरिता केस स्टडीज विकसित करणे ह्या काही प्राथमिक उद्दिष्टांचा सामंजस्य करारात समावेश आहे."  याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कंपनीचे संचालक निरंजन वाघमारे म्हणाले " आम्ही या संस्थेस आमचे योगदान देण्यास व सकारात्मक बदल...

गळीत हंगामाची उत्साहात सांगता;१३ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप...

Image
कृष्णा कारखान्याचे १३ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप... गळीत हंगामाची उत्साहात सांगता; १५ लाख २० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन... शिवनगर, दि .30: येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात १३७ दिवसात १३ लाख ५० हजार ६५२ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच १५ लाख २० हजार ७२० क्विंटल साखर पोती उत्पादित केली असल्याचे प्रतिपादन, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, प्र. कार्यकारी संचालक बालाजी पबसेटवार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, टेक्निकल को-ऑर्डीनेटर एस. डी. कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हाईस चेअरमन श्री. जगताप पुढे म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नाने यावर्षीचे उद्दिष्ट कारखान्याने पूर्ण केले आहे. ऊसतोड वाहतूकदारांना कारखाना सर्वोतोपरी सहकार्य करणार असून, त्यांना साखर संघाने ज...

कराडच्या कसाबवाड्यात पोलिसांचा छापा; सहा जणांना घेतले ताब्यात...

Image
कराडच्या कसाबवाड्यात पोलिसांचा छापा; सहा जणांना घेतले ताब्यात... कराड दि.29-कराड शहरातील गुरूवार पेठ भाजी मंडई, कसाबवाडा व मुजावर कॉलनी येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने आज सकाळी छापा टाकला. यामध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेली 40 जनावरे आढळून आली. तसेच काही मांस कातडेसह आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले असून वाहतुकीकरीता वापरत असलेली तीन वाहने ही जप्त केले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस हवालदार प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांना शहानिशा करणेकरीता भाजी मंडई, कसाबवाडा येथे पाठविले. त्याठिकाणी काही जणांनी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेली आढळून आले. याशिवाय मांस ही कातडेसह आढळून आले. दरम्यान मुजावर कॉलनी येथे देखील 4 गोवंश जातीच्या गाई कत्तलीसाठी बांधून ठेवल्याच्या आढळून आल्या. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ ...

साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका; हॉकर्स संघटनेची नगरपरिषदेकडे आर्त हाक...

Image
साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका; हॉकर्स संघटनेची नगरपरिषदेकडे आर्त हाक... कराड दि.29-शहरातील रस्त्यावरील सर्वे झालेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना आहे त्या जागेवरून हाकलू नये असा आदेश असतानाही कराड नगर परिषदेने अतिक्रमण मोहीम राबवून सरसकट व्यवसायिकांना हटवले आहे. त्यामुळे फक्त सर्वे झालेल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी यासाठी कराड हॉकर्स संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका अशी अशी आर्त हाक हॉकर्स संघटनेने कराड नगरपरिषदेकडे केली आहे. कराड शहरात हातगाडे वाढत असलेने अडचण होत आहे. परंतु सुप्रीमकोर्टाचे आदेशाप्रमाणे पालिकेकडून समिती नेमली गेली नाही व हॉकर्स झोनची निर्मितीही केली नाही. कोर्टाचे आदेशाप्रमाणे 2014 पर्यन्त हॉकर्स धारकांचा ऑनलाईन सर्वे झाला आहे. परंतु त्यांना ओळखपत्र दिले गेले नाही. त्यामुळे नवीन हातगाडे वाढत आहेत. सर्वे झालेल्या लोकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना आहे त्या जागेवरून हाकलू नये असा आदेश आहे.  दरम्यान कराड नगरपालिकेने शहरातील सर्वे झालेल्या व्यावसायिकांना आहे त्या जागेवर व्यवसाय करण्यास ...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांने कृष्णा कालव्यात पाणी आल्याने शेतकरी आनंदित...

Image
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांने कृष्णा कालव्यात पाणी आल्याने शेतकरी आनंदित... कराड दि.29: कराड तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील जवळपास 60-70 गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन गेल्या दोन महिन्यापासून पाण्याविना राहिल्याने प्रश्न गंभीर बनला होता. आज या कृष्णा कालव्यात पाणी खळाळल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.  याबाबत कराड तालुक्यातील विशेषतः कार्वे, वडगाव हवेली, शेरे, शेणोली आदी भागातील शेतकऱ्यांनी आ.पृथ्वीराज चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्याची विनंती केली त्यानुसार आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यानुसार कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक यांना पत्राच्या माध्यमातून 20 मार्च 2024 रोजी पाठपुरावा केला. पण तरीही पाणी सोडण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने संबंधित गावातील शेतकरी पुन्हा एकदा पृथ्वीराज बाबांच्या भेटीला आले त्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 26 मार्च रोजी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना फोनच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत तसेच उद्भव...

म्होप्रे येथे जमिनीच्या वादातुन खुन करुन पळून गेलेल्या 4 आरोपींना अटक...खुनाचा गुन्हा 2 तासात केला उघड...

Image
म्होप्रे येथे जमिनीच्या वादातुन खुन करुन पळून गेलेल्या 4 आरोपींना अटक...खुनाचा गुन्हा 2 तासात केला उघड... कराड दि.- म्होप्रे ता. कराड येथे जमिनीच्या वादातून काल सायंकाळी एकाचा खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास जलद गतीने करून कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या खून प्रकरणी कराड शहर व परिसरातून 4 जणांना अटक केली आहे. दिलीप संकपाळ हे म्होप्रे ता. कराड गावात त्यांचे घराचे पाठीमागे पत्र्याचे शेडचे काम करीत होते. त्यांचा व त्यांचे भाऊ रमेश संकपाळ यांचा जमिन व जागा वाटपावरुन वाद चालू होता. शेडचे काम चालू असताना रमेश संकपाळ यांची मुले अनिल संकपाळ व सुनिल संकपाळ हे तेथे गेले. त्यांनी शेडचे कामास विरोध करुन काम बंद पाडले. त्याठिकाणी अनिल व सुनिल यांनी दिलीप संकपाळ यांची मुले किरण व किशोर यांचेशी वाद चालु केला. वाद चालु असताना दिलीप संकपाळ यांनी गावातील प्रकाश बाबुराव पाटील यांना मध्यस्थी करण्यासाठी बोलाविले परंतु अनिल व सुनिल त्यांचेदेखील काहीही ऐकत नसल्याने ते निघुन गेले. त्यानंतर अनिल व सुनिल यांनी फोन करुन त्यांचा नातेवाईक रणजित जाधव रा- गोळेश्वर यास तेथे बोलावि...

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; बेकायदेशीरत्या प्रवेश करणाऱ्या तडीपार आरोपीच्या मुस्क्या आवळल्या...

Image
  कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; बेकायदेशीरत्या प्रवेश करणाऱ्या तडीपार आरोपीच्या मुस्क्या आवळल्या... कराड दि.24-सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया दरम्यान बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या व सातारा सांगली जिल्ह्यातून तडीपार असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेठरे खुर्द येथे मुस्क्या आवळल्या आहेत. महादेव बाळासो कोळी (वय 36) रा. किल्लेमच्छिद्रगड असे या तडीपार इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील फरारी/पाहिजे व तडीपार तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन त्याचेवर कडक कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कडक कारवाई करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. काल दि. 23 रोजी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना त्याचे विशेष गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, कराड तालुका पोलीस ...