कराडात वाहनचालकांची वाहतूक पोलिसांशी हुज्जत;30 वाहनचालकांवर कारवाई...
कराड-मलकापूर सर्व्हिस रोडवर वाहन चालकांचा उलट दिशेने प्रवास;30 वाहनांवर कारवाई... कराड दि.18 (प्रतिनिधी) महामार्गावर सहा पदरीकरणा अंतर्गत कोल्हापूर नाका-मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असल्याने कराड शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी सेवा रस्त्यावरून एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र अनेक वाहनचालक या सेवा रस्त्यावरून उलट दिशेने जात असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा करुन वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत असल्याने वाहतूक शाखेने तीसहून अधिक वाहनचालकांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. सर्व्हिस रोडवरुन मलकापूरहून कराडचे दिशेने व कराड होऊन मलकापूरच्या दिशेने उलट जाणाऱ्या वाहनांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वाहतूक शाखेने दिला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. कराड ते मलकापूर दरम्यान असलेला उड्डाणपूल पाडण्यात येत आहे. सदर पूल पाडण्याचे कामाचे वेळी सातारा बाजूकडून कराड व पुढे कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक ही सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्या वळवून पुढे कोल्हापूर बाजूकडे ...