Posts

Showing posts from June, 2025

कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश कुर्ले यांची निवड

Image
कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश कुर्ले यांची निवड  कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश अरुण कुर्ले यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने केली असून निवडीचे नियुक्ती पत्र नुकतेच कुर्ले यांना देण्यात आले आहे. कराड शहरातील नागेश कुर्ले हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यशवंतराव चव्हाण ऑटो रिक्षा गेटचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतूक आघाडी गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याअध्यक्ष राहूल होनकळस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वाहतूक आघाडीची बैठक झाल्यानंतर वाहतूक आघाडीच्या निवडी करण्यात आल्या आहेत. मा.श्री. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने कुर्ले यांची रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वाहतूक आघाडी कराड तालुका अध्यक्ष या पदी २ वर्ष कालावधी साठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल वाहतूक आघाडीने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आज वाहतूकदारांना खंबीर नेवृत्त्वाची गरज अस...

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे यशस्वी निवड

Image
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे यशस्वी निवड कराड, दि. 28 : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे पुण्यातील नामांकीत कंपनीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  याबद्दल अधिक माहिती देताना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. नामदेव जाधव म्हणाले, आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच, शिक्षणानंतर उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नामांकीत कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी, संस्थेच्या ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागाच्यावतीने नियमितपणे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. नुकतेच पुण्यातील सुप्रसिद्ध अजिओ फार्मास्युटिकल्सने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये, संस्थेत बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेह...

कराडमध्ये भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन

Image
  भाजपा महिला मोर्चातर्फे शुक्रवारी कराडमध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन आणीबाणीच्या काळातील लोकशाही हल्याची होणार चर्चा; पदाधिकारी होणार खासदारांच्या भूमिकेत सहभागी कराड, दि. 26 : भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने शुक्रवारी (ता. २७) कराडमधील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘मॉक पार्लमेंट’मध्ये भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी खासदारांच्या भूमिकेत सहभागी होत, आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील हल्याची चर्चा करणार आहेत.  १९७५ साली लागू झालेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय मानला जातो. त्या काळात मानवी हक्कांची गळचेपी, स्वातंत्र्याचा संकोच आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांची कुचंबणा यांचा संपूर्ण देशाने अनुभव घेतला होता. २१ महिन्यांच्या त्या अंधकारमय कालखंडाची आठवण आजही देशवासीय विसरलेले नाहीत. या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील हल्याची ...

सुभीत अकॅडमीतर्फे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम;आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Image
सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिचा सत्कार करताना आ. डॉ. अतूल भोसले व इतर ... सुभीत अकॅडमीतर्फे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम;आ. डॉ. अतुलबाबा भोसले सुभीतच्या नीट आणि जेईईमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  कराड, दि. 26 - कराडची माती मूळचीच गुणवत्तापूर्ण असून येथील विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. स्पर्धात्मक काळात बिहारमधून कराडमध्ये येत येथील विद्यार्थी यशस्वी करण्याचे काम सुभीत अकॅडमीतर्फे केले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून या अकॅडमीच्या यशस्वी निकालाचा राहिलेला चढता आलेख कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.  येथील शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटीतील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्यांच्या आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे, अकॅडमीचे संचालक सुभीत यादव, नायब तहसीलदार बी. डी. कुंभार, माजी नगरसेविका अंजली कुंभार, कै. काशिनाथ नारायण प...

पत्रकार देवदास मुळे यांना शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

Image
  पत्रकार देवदास मुळे यांना शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार  कराड, दि. 24 (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली यात 2021 सालचा राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक तरुण भारत संवाद चे कराड कार्यालय प्रमुख देवदास प्रल्हाद मुळे यांना जाहीर झाला आहे. गेली 25 वर्षे मुळे हे पत्रकारितेत काम करीत आहेत. रोख 51 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हा राज्यस्तरीय आहे. या पुरस्कारासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेतून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे एका वर्षातील लिखाणाचे प्रस्ताव मागवण्यात येतात. या प्रस्तावांमधून एका प्रस्तावाची निवड करण्यात येते. २०२१ या वर्षात कोरोना महामारीचे संकट होते. त्यावेळी स्वच्छता मोहिमेसही महत्व होते. त्या वर्षात स्वच्छता विषयक केलेल्या लिखाणाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. देवदास मुळे यांनी २०१८ सालापासून कराड नगरपरिषदेच्या...

‘सुभीत’ अकॅडमीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी सत्कार सोहळा

Image
  ‘सुभीत’ अकॅडमीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी सत्कार सोहळा   नीट आणि जेईई परीक्षेत घवघवीत यश; पाच वर्षांतील यशाच्या चढत्या आलेखावर टाकणार प्रकाशझोत कराड, दि. 23 : - येथील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी, शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी, कराडच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा 2025 मध्ये सुयश संपादन केले आहे. या यशवंत विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे बुधवार (दि. 25) जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. कृष्णामाई मंगल कार्यालय, सोमवार पेठ, कराड येथे दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अकॅडमीचे संस्थापक प्रा. सुमीत यादव यांनी दिली. या विशेष सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि हिंदू एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कराडमधील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल फासे उपस्थित राहणार आहेत. सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिने नीट परीक्षेत 720 पैकी 557 गुण मिळवून सुयश मिळवले. तर सायली शेलार हिने 508 गुण, अफान बागवानने...

कराड येथे रोटरी जलतरण स्पर्धेस जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
विजेत्यांचा गौरव करताना रामचंद्र लाखोले, बाळासाहेब कुलकर्णी, बाळासाहेब मोहिते, मुरली वत्स, सुधीर चोरगे, अजय भट्टड, आनंदा थोरात व मान्यवर. कराड येथे रोटरी जलतरण स्पर्धेस जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद कराड, दि.22: रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने कै.सौ.सु.ल.गद्रे यांच्या स्मरणार्थ सातारा जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने संगम हेल्थ क्लब येथे आयोजित जिल्हास्तरीय रोटरी जलतरण स्पर्धेस जिल्ह्यातील स्पर्धेकांची सहभाग घेतल्याने स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगम हेल्थ क्लब येथे कै.सौ.सु.ल.गद्रे यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ कराड आयोजित रोटरी जलतरण स्पर्धेचे उद्घाटन संगम ग्रुपचे बाळासाहेब कुलकर्णी व रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे सुधीर चोरगे, रोटरी क्लब ऑफ कराड सचिव आनंदा थोरात, संगम हेल्थ क्लब प्रमुख मुरली वत्स, प्रोजेक्ट चेअरमन अजय भट्टड यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. ही जलतरण स्पर्धा फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटर फ्लाय या प्रकारात चार वेगवेगळ्या वयानुसार गटात झाल्या. यास्प...

सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश

Image
  सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश  सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत; पाच वर्षांपासून यशाचा चढता आलेख कायम – यादव कराड, दि. 21 - येथील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी, शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी, कराडच्या विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट परीक्षा 2025 मध्ये सुयश संपादन केले. या अकॅडमीने आपल्या पाच वर्षांच्या वाटचालीत यशाचा चढता आलेख कायम ठेवला असून हे यश अकॅडमीच्या गुणवत्तेचे प्रतीक असल्याचे मत अकॅडमीचे संचालक सुभीत यादव यांनी व्यक्त केले.  वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजेंसीच्या माध्यमातून नीट यूजी (NEET – UG) परीक्षा घेतली जाते. देशभरासह परदेशातील परीक्षा केंद्रांवर 4 मे 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये नीट परीक्षा क्रॅक करण्यामध्ये नावलौकिक असलेल्या कराड येथील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या तब्बल सहा विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले आहे. यामध्ये सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिने नीट परीक्षेत 720 पैकी 557 गुण मिळवून सुयश मिळवले. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चधिकार समितीवर नियुक्ती

Image
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चधिकार समितीवर नियुक्ती कराड, दि. 20 - महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असलेल्या उच्चाधिकार समितीची राज्य सरकारने पुनर्रचना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, आ. जयंत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. रोहित आर पाटील, आ. राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्षनेता, विधानपरिषद विरोधी पक्षनेता, माजी मंत्री प्रकाश आवाडे अशी एकूण 18 सदस्यीय समिती शासनाकडून गठीत करण्यात आली आहे.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी 2000 मध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या समितीच्या माध्यमातून सीमावादासंबंधी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. समितीचे निर्णय न्यायालयीन राजकीय ...

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार

Image
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ४.७० कोटींचा निधी मंजूर  कराड, ता. १६ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड दक्षिणमधील ११ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे.  अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ११ गावांमध्ये तब्बल २२ सौर हायमास्...

शेतकऱ्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे; दत्तात्रय खरात

Image
  मलकापूर - माजी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करताना शेती कृषी मित्र अशोकराव थोरात व इतर मान्यवर. शेतकऱ्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे; दत्तात्रय खरात कराड, दि. 9 - या देशातील व महाराष्ट्रातील शेती व शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीवर आधारितच अर्थव्यवस्था सेवा उद्योग व इतर उद्योगांना जिवंत ठेवते याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे असे उद्गगार माजी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी काढले.  कराड तालुक्यातील माजी कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांचा सेवापुर्ती कार्यक्रम परिसरातील प्रगतशील प्रयोगशील उपक्रमशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या वतीने आदर्श जुनियर कॉलेज मलकापूर या ठिकाणी संपन्न झाला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी शेतीविषयक सरकारची अनास्था व चुकीच्या धोरणामुळे आज शेती व शेतकरी अडचणीत आला आहे असे प्रतिपादन केले. भारत हा एक कृषीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे जर शेती व शेतकरी यांना सक्षम ठेवायचे असेल तर शासनाची शेती विषयक नवीन धोरणे कायदे ध्येय असायल...

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा ; आ. डॉ. अतुल भोसले

Image
  नवी दिल्ली: महामार्गा रुंदीकरण कामाच्या दिरंगाईबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांना निवेदन देताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा ; आ. डॉ. अतुल भोसले  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला भेट देत मागणीचे दिले निवेदन कराड, दि. 8 : गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाअंतर्गत कराड शहरालगत सहापदरी उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र या कामाच्या दिरंगामुळे कराड परिसरातील महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, परिणामी अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. काही घटनांमध्ये दुर्दैवाने जीवितहानीदेखील झाली आहे. याची गंभीर दखल घेत, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी थेट नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला भेट देत, अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.  पुणे - बंगळुरू महामार्ग हा राष्ट्रीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा दळणवळण मार्ग असून, यावरील वाहतूक सुरळीत व स...

विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद - पृथ्वीराज चव्हाण

Image
बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद - पृथ्वीराज चव्हाण   जय-पराजय होत असतो पण निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षपाती पणा करून निकाल वळविण्याची चुकीची पद्धत महाराष्ट्र निवडणुकीत पहिल्यांदाच इतिहासात नोंद झाली. मुंबई, दि. 6 : महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो निकाल लागला तो अनपेक्षित निकाल होता. २०२४ च्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या ४-५ महिन्याच्या कालावधीत नवीन मतदार संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळून येते. या प्रक्रियेत दुबार, तिबार मतदारांची मतदार यादीत नावे असताना निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बोगस मतदार वाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबविली. तसेच मतदानाच्या आकडेवारीत सुद्धा वाढलेली टक्केवारी बाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले गेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी बाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.  याआधी अनेक निवडणूका आम्ही लढवल्या आहेत. यंत्रणेचा अशाप्रकारे गैरवापर कधीही होत नव्हता....

खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे क्रीडामंत्र्यांचे आदेश

Image
मुंबई : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण पाहताना क्रीडा मंत्री ना. दत्तात्रय भरणे. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले, तहसीलदार कल्पना ढवळे, क्रीडा अधिकारी संगीता जगताप व अमृता पारकर. खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे क्रीडामंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. 5 : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडामंत्र्यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.  कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्...

कृष्णा विद्यापीठाला मिळालेली मानांकने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन व आरोग्य सेवेसाठी आदर्श प्रतीके; राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Image
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १३ व्या दिक्षांत सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीचे पदक पल्लवी पवार हिला प्रदान करताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. नीलम मिश्रा, विनायक भोसले, दिलीप पाटील, डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. एम. व्ही. घोरपडे व अन्य मान्यवर कृष्णा विद्यापीठाला मिळालेली मानांकने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन व आरोग्य सेवेसाठी आदर्श प्रतीके; राज्यपाल सी पी राधाकृष्णन कराड, दि. 3 : कृष्णा विश्व विद्यापीठाने वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात देशपातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाला मिळालेली विविध राष्ट्रीय पातळीवरील मानांकने ही विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवेसाठीची आदर्श प्रतीके आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १३ व्या दिक्षांत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दिक्षांत सोहळा रंगला. पोलिस बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्...

राजेंद्रसिंह यादव यांची शिवसेना जिल्हा समन्वयकपदी निवड

Image
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्वीकारताना राजेंद्रसिंह यादव.... राजेंद्रसिंह यादव यांची शिवसेना जिल्हा समन्वयकपदी निवड पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान कराड, दि. 2 - शिवसेनेच्या सातारा जिल्हा समन्वयक पदी शिवसेना नेते व कराडच्या यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे. कराड येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात राज्याचे पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राजेंद्रसिंह यादव यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. संपर्क प्रमुख शरद कणसे यावेळी उपस्थित होते. या निवडीच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव यांना शिवसेनेत जिल्हा स्तरावर काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यादव यांना संघटन कौशल्यासाठी सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे शिवसेना बळकट करण्यासाठी यादव यांचा उपयोग होईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत आहेत. राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर कराड शहराच्या व...

कृष्णा विश्व विद्यापीठाचा मंगळवारी १३ वा दीक्षांत सोहळा

Image
  कृष्णा विश्व विद्यापीठाचा मंगळवारी १३ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती: १०६२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान कराड, दि. 2 : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत सोहळा मंगळवार दिनांक ३ जून रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार असून, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील १०६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे...

एकनाथ शिंदेंनी जिल्ह्याला भरभरून दिले; त्यांचे हात बळकट करा;पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
एकनाथ शिंदेंनी जिल्ह्याला भरभरून दिले; त्यांचे हात बळकट करा;पालकमंत्री शंभूराज देसाई कराडमध्ये शिवसेनेचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा उत्साहात  कराड, दि. 1 - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सातारा जिल्ह्याला भरभरून निधी दिला आहे. आपला जिल्हा म्हणून त्यांना सातारा जिल्ह्याबद्धल जिव्हाळा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी सातारा जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनमध्ये आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या उपस्थितीत कराड शहरसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रक्षप्रवेश केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, राहुल खराडे, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, विनायक पावसकर, विनोद भोसले, ओंकार मुळे, चंद्रकांत जाधव, विद्या पावसकर, सुलोचना पवार, रणजीत भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,...