कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; कोयना धरणात पाणीसाठा वाढला...
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; कोयना धरणात पाणीसाठा वाढला... कराड दि.1 (प्रतिनिधी) जिल्ह्यात मान्सूनने जोर धरला नसला तरी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कोयना, नवजा सह महाबळेश्वर येथे सध्या पाऊस सुरू आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 72 मिलिमीटर, नवजा येथे 97 तर महाबळेश्वर येथे 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 20.04 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे. धरणातून 11 हजार 943 क्यूसेक्स आवक सुरू आहे आज सकाळी 8 वाजेपर्यंत... कोयना-72 मिलिमीटर (843) नवजा-97 मि.मी.(1072) महाबळेश्वर-155 मि.मी.(863) गत वर्षी आजच्या दिवसी धरणात 11.95 टी एम सी पाणी साठा होता.. गत वर्षी कोयना-83 मिलिमीटर (404) नवजा-110 मि.मी.(539) महाबळेश्वर-128 मि.मी.(723)