सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह
सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्यावर ठाम कराड , दि. 19 : शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचे प्रामाणिक पालन करणारा पक्ष काँग्रेसच असल्याने हाताचं चिन्ह म्हणजेच काँग्रेसचा विचार असून तो जपण्याची आज नितांत गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. सुपने-तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मिटिंग सुपने येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, बलराज पाटील, जगदीश पाटील, अशोक पाटील, सतीश पानुगडे, सुहास पाटील, प्रदीपराव थोरात, बजरंग पाटील, दादाराम जाधव, विद्याधर पाटील, विजय देवकर, सौ. अक्षदा पवार, सौ. पूजा पवार, हिंदुराव पाटील, निवृत्ती माळी, आदिसह सुपने तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आगामी निवडणुका काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरच लढवाव्यात, यावर कार्यकर्ते ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नि...