सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चालत जावून घेतला पन्हाळा ते पावनखिंड राजमार्गावरील ऐतिहासिक प्रवासाचा थरारक अनुभव...
सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चालत जावून घेतला पन्हाळा ते पावनखिंड राजमार्गावरील ऐतिहासिक प्रवासाचा थरारक अनुभव ... कराड, दि. 2 - जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय कराड तर्फे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटना व प्रत्यक्ष घडलेला इतिहास अनुभवण्यासाठी शाळेच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक अभ्यास पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी विद्यालयाच्यावतीने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, सचिव अनिल कुलकर्णी व मुख्याध्यापिका सोनाली जोशी यांच्या प्रेरणेने व समन्वयक विजय कुलकर्णी व स्वाती जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि बाका प्रसंग म्हणजे पन्हाळा वेढ्यातून विशाळगडाकडे करून घेतलेली सुटका व घोडखिंड मध्ये बाजीप्रभू / फुलाजी प्रभू व सिद्धीच्या सैन्यासोबत झालेला लढाईचा थरारक इतिहास, बाजीप्रभू व त्यांच्या सैन्यानी स्वराज्...