Posts

कराड शहर डीबी कडून चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Image
कराड : चैन स्नॅचिंग प्रकरणी अटक केलेल्या आरोपी समवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी कराड शहर डीबी कडून चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. कराड, दि. 31 (प्रतिनिधी) - कराड शहरा व परिसरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत सात गुन्हे उघडकीस आणत सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संभाजी गोविंद जाधव रा. चंद्रसेननगर सांगली रोड विटा ता. खानापुर यास अटक करण्यात आली आहे.  कराड शहर पोलिसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सैदापुर, मलकापुर व कराड शहरात चैन स्नॅचिंगचा हैदोस घालणा-या आरोपीस अटक केले आहे. गेले काही महीन्यापासुन कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सैदापूर, मलकापुर व कराड शहरामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते. सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हे नोंद करणेत आलेले आहेत. सदर गुन्हयांचे तपास कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रक...

सह्याद्री निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा संबंध नाही; माझ्या नावाचा खोटा प्रचार - पृथ्वीराज चव्हाण

Image
सह्याद्री निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा संबंध नाही; माझ्या नावाचा खोटा प्रचार - पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 31 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाही. ही सहकाराची निवडणूक आहे, याचे सभासद आहेत. या निवडणुकीशी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही. त्यामुळे मी कुठेही सह्याद्री निवडणुकीच्या अनुषंगाने काहीही बोललेलो नाही माझ्या नावाचा खोटा प्रचार सुरू असून काहीजण माझ्या नावाचा वापर करून संभ्रम व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत आठवड्यात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत पी डी पाटील पॅनलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्या नावाचा वापर करून किंवा पक्षाच्या वतीने कोणी काहीही बोलेल असे होणार नाही. मी कोणालाही माझं वकीलपत्र दिलेलं नाही. माझ्या नावाचा ...

कराडात सोमवारी ईदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण

Image
  कराड संग्रहित छायाचित्र कराडात सोमवारी ईदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण  कराड, दि. 30 (प्रतिनिधी) देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी चंद्र दर्शन झाल्याने उद्या सोमवारी 31 मार्च रोजी देशभरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. कराड शहर व परिसरात रमजान ईद विविध उपक्रमाने साजरी होणार असून शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज पठण (प्रार्थना) होणार आहे. अशी माहिती शाही ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे ट्रस्टी व सामाजिक कार्यकर्ते साबीरमिया मुल्ला यांनी दिली. रमजान ईद निमित्त आज रविवारी शहरातील बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वत्र ईद साजरी केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार कराड शहरातील ऐतिहासिक मनोरे मज्जिद येथून सकाळी आठ वाजता जुलूस (मिरवणूक) निघणार आहे. त्यानंतर ऐतिहासिक ईदगाह मैदानावर नऊ वाजता सामूहिक नमाज पठण (प्रार्थना) होणार आहे. कराड शहरातील इतरही मस्जिद...

विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी सह्याद्रीची निवडणूक लावली - डॉ. विश्वजीत कदम

Image
कडेगाव :हिंगणगाव बुद्रुक येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना डॉ. विश्वजीत कदम यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, अरुण लाड व अन्य मान्यवर.  विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी सह्याद्रीची निवडणूक लावली - डॉ. विश्वजीत कदम    हिंगणगाव बुद्रुक मध्ये प्रचार सभेस उस्फुर्त प्रतिसाद     कडेगाव, दि. 30 (वार्ताहर) - विरोधकांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ राजकीय स्वार्थसाठी लावल्याची टिका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. ते हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव ) येथे आयोजित सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पॅनेल प्रमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, स्व. पी. डी. पाटील यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याने सभासदांना चांगला दर दिला आहे. वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अशा चांगल्या चालणाऱ्या का...

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई....

Image
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई.... विंग येथिल कापड दुकानातील चोरीचा गुन्हा केला दोन दिवसात उघड;72 हजाराचा मुद्देमाल जप्त कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - विंग ता. कराड येथे 22 मार्च रोजी मध्यरात्री  MH50 मेन्स वेअर या कापड दुकानाच्या शटरचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन आतील ग्लासचे डिजीटल लॉक उचकटून चोरी केल्याची घटना घडली होती. या बाबत तक्रार दिलेने नमुद गुन्हा दाखल करणेत आला होता.  दिनांक 23 मार्च 2025 रोजी दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने वरिष्ठांच्या सुचना नुसार कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे तात्काळ आरोपी शोध कामी रवाना झाले होते, पहील्या टप्यात विंग स्टॉप, कोळे, कोळेवाडी, व चचेगांव वरील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज सलग 2 दिवस पाहुन त्याच्या साहयाने व खास बातमीदाराच्या महिती प्रमाणे संशयीत इसम यांची पडताळणी केली. व सलग दोन दिवस पाठलाग करुन अल्ताफ मगदुम मुल्ला, रा-चचेगांव यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करीत असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याचेकडे कसुन तपास करता त्याने गु...

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Image
  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कराड, ता. २८ : कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोयना वसाहत येथील कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आ. डॉ. भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  प्रारंभी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ते कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहिले. याठिकाणी केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुदन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ उंडाळकर, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, ...

कराड लाचलुचपत प्रकरणात एकाला अटक;दोन दिवस पोलीस कोठडी

Image
कराड लाचलुचपत प्रकरणात एकाला अटक;दोन दिवस पोलीस कोठडी  नगरपरिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी फरार कराड, दि. 27 (प्रतिनिधी)  - कराड शहरात बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांपकी दोघांना अटक केल्यानंतर काल एकाच ताब्यात घेऊन आज येथील न्यायालयात त्यास हजर केले असता दोन दिवसाची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणातील हा खाजगी समाज असन अजिंक्य देव असे त्याचे नाव आहे. दरम्यान या लाच प्रकरणात चौघा विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन कार्यमुक्त मुख्याधिकारी अद्यापही फरार असून ते स्वतःच्या बचावासाठी जामीना साठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान या प्रकरणातील खाजगी इसमाला लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यालाच प्रकरणात सातारा लाच रुचपत विभागाने यापूर्वी नगर परिषदेमधील बांधकाम विभागातील तौफिक शेख तसेच नगररचना कार्यालयातील स्वानंद शिरगुप्पे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यानंतर त्यांनी या दोघांच्या घरांची झडत...