जुळेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले...
जुळेवाडी : रस्ता सुधारीकरण कामाचे भूमिपूजन करताना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले... जुळेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले... जुळेवाडी, दि.3: महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात पाणंद रस्त्यांसाठी ४५ कोटींचा निधी आणला आहे. येत्या काळात जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच जुळेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. जुळेवाडी (ता. कराड) येथे रस्ता सुधारीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा अंतर्गत अतिरिक्त राज्य कुशल निधीतून डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जुळेवाडीत अंतर्गत रस्ता सुधारीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. याचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ कराड दक्षिणमधील लाभार्थींना मिळवून देण्य...