नडशी येथील बाबुराव थोरात (आण्णा) यांचे निधन...
नडशी येथील बाबुराव थोरात (आण्णा) यांचे निधन... मसूर दि.9-नडशी (ता.कराड) गावचे प्रगतशील शेतकरी बाबुराव गणपती थोरात (आण्णा) यांचे शुक्रवार दिनांक 8 मार्च, 2024 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपती थोरात (आबा) यांचे ते थोरले बंधू होत. थोरात अण्णांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळाऊ होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे, भाऊ, भावजय पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन विधी सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी 9.00 वा. नडशी येथे आहे.