Posts

चला उद्या करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, शहरातील 'या' 14 वार्डात आयोजन; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; कराड नगरपरिषद...

Image
  माझी माती माझा देश या अभियानांतर्गत आज कराड नगर परिषदेच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी आरोग्य अभियंता आरडी भालदार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे सर्व विभागाचे मुकादम आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. चला उद्या करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, शहरातील 'या' 14 वार्डात आयोजन; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; कराड नगरपरिषद... राजू सनदी कराड दि.30- इंडियन स्वच्छ लीग.2.0, स्वच्छतेचा पंधरावडा आणि स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर  देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना 'स्वच्छांजली' अर्पण करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता नागरिकांच्या नेतृत्वाने स्वच्छतेबाबत एक मोठा कार्यक्रम आयोजित केले आहे. तरी 1 ऑक्टोबर  सकाळी 10 वाजता शहरातील नागरिकांनी आपल्या वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन कराड नगरपरिषद तर्फे शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे. खालील ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे. 1. वॉर्ड 1 - महादेव मंदिर वाखान 2. वॉर्ड 2 - छत्रपती शिवाजी उद्यान परिसर ...

ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुट्टी जाहीर... उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या...

Image
ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुट्टी जाहीर... उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या... राजू सनदी कराड  कराड दि. 27 (प्रतिनिधी) यावर्षी अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने ईद-ए-मिलादची 28 सप्टेंबर रोजी असणारी सुट्टी शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी जाहीर केल्याची आदी सूचना राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आली आहे. त्यामुळे ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुट्टी असणार आहे. यामुळे उद्यापासून सलग चार दिवस हे सुट्ट्यांचे असणार आहेत. राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि यावर्षी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर...

कराड शहरात अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीत बदल...

Image
कराडात अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीत बदल... राजू सनदी कराड कराड दि. 26 (प्रतिनिधी) अनंत चतुर्थी दिवशी गणेश विसर्जन मिरवणुक अनुषंगाने कराड शहरातील वाहतुक मार्गातील तात्पुरता बदल करण्यात आला असून शहरातील नागरिकांना त्यादिवशी वाहतुकीच्या बदललेल्या मार्गाचा वापर करावा असे आवाहन कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चर्तुदशी असल्याने कराड शहरातील तसेच कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मुर्तीचे मोठया प्रमाणात विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्ती या दत्त चौक येथून मिरवणुकीने कृष्णा घाट येथे जात असतात, त्यामुळे दत चौक ते कृष्णा घाट व कमानी मारुती-चावडी चौक कृष्णा घाट या मेन रोडला येणारी सर्व वाहतुक मार्गात विसर्जन दिवसांकरीता अंशतः तात्पुरता बदल करण्यात आला आहे याची सर्वानी नोंद घ्यावी. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये असलेल्या अधिकारान्वये दिनांक २८/०९/२०२३ चे ०६.०० वा. पासुन ते दिनांक २९/०९/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पर्यतचे काला...

सफाई मित्र सुरक्षा अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने प्रदान...

Image
  सफाई मित्र सुरक्षा अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने प्रदान... कराड दि. 25 -स्वच्छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी आयोजित  केलेल्या इंडियन स्वच्छता  लीग 2.0 अंतर्गत "स्वच्छ पंधरवडा" व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत मोहिम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना "सफाई मित्र सुरक्षा अभियान" व "स्वच्छता ही सेवा" अभियान अंतर्गत सुरक्षा साधने प्रदान करण्यात आली.  कराड नगर परिषदेचे सफाई कर्मचारी हे कोणतीही काळ वेळ न पाळता कोणत्याही आपत्तीची पर्वा न करता 24x7 शहर स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. त्याचाच एक भाग म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा बूट, सुरक्षा हेल्मेट, रिफ्लेकटिंग जॅकेट व सुरक्षा हातमोजे यावेळी देण्यात आली. यावेळी उपमुख्याधिकारी विशाखा पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, नगर अभियं...

कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश.... बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट....

Image
कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश.... बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट.... कराड, दि.25-: कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. विशेष म्हणजे सभा सुरू असतानाच अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करत, एका क्लिकवर बँकेच्या सभासदांच्या खात्यावर तात्काळ लाभांश रक्कम जमा करण्यात आली.   य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विराज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थित...

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम....

Image
  मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम.... सातारा दि. 25–भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित मतदार याद्यांचे मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमामुसार जिल्ह्यातील 255 फलटण, 256 वाई, 257 माण, 259 कराड उत्तर, 260 कराड दक्षिण, 261 पाटण, 262 सातारा या 8 विधानसभा मतदार संघांच्या प्रस्तावित प्रारुप मतदान केंद्रांची यादी जिल्हा निवडणूक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा, कराड, वाई, फलटण, माण, कोरेगाव, पाटण तसेच सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सातारा, जावळी, कोरेगाव, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, माण (दहिवडी), खटाव यांच्या कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या  यादीवर काही सूचना असल्यास त्या 3 ऑक्टोबर 2023 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा मतदार नोंदणी ...

कराडात हजारो गणेश मूर्तींचे पालिकेच्या जलकुंडात विसर्जन...

Image
कराडात हजारो गणेश मूर्तींचे पालिकेच्या जलकुंडात विसर्जन... राजू सनदी, कराड कराड दि.24-(प्रतिनिधी) गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शनिवारी घरगुती गणेशमूर्ती व गौरीचे विसर्जन कोयना कृष्णा नदी पात्रात भक्तीभावाने करण्यात आले. शहरात कराड नगरपरिषदेने ठिकठिकाणी ठेवलेल्या 19 जलकुंडात 1 हजार 800 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर सुमारे 15 ट्रॉली निर्मल्य संकलित करण्यात आले. काल विसर्जन झाल्यानंतर आज सकाळी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्राची स्वच्छता ही केली. कराड पालिकेने कृष्णा कोयना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची जनजागृती करत मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील 19 जलकुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. तसेच गणेश भक्तांनी निर्मल्य कलशात व अन्य ठिकाणी नदीपात्रात टाकलेले 15 ट्रॉली निर्माल्य संकलित करून कृष्णा घाट, कृष्णा कोयना नदी पात्राची स्वच्छता केली. काल पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची व गौरी पूजन नंतर एकत्रित विसर्जन करण्यात आले. कृष्णा घाटावर दुपारनंतर विसर्जनासाठी मोठी गर्दी गणेश भक्त...