Posts

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभास प्रीतीसंगमावरून प्रारंभ...

Image
  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभास प्रीतीसंगमावरून प्रारंभ... कराड दि. 14 (प्रतिनिधी) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभाचा येथील प्रीतीसंगमावरून शुभारंभ करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांच्यासह सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी सर्वांनी समाधीस अभिवादन केले व यानिमित्ताने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर प्रज्वलित करण्यात आलेली यशवंत ज्योत साताऱ्याकडे मार्गस्थ करण्यात आली. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बँकेने राबवलेले उपक्रमांची जिल्हाभर जनजागृती करून बँकेचा नावलौकिक वाढवण्याबरोबरच बँकेची प्रगती करण्याचा मनोज यावेळी संचालकांनी व्यक्त करून नाबार्डने गौरवलेल्या या बँकेचा देशभर नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यमान संचालक प्रयत्नशील असणार असल्याची ग्वाही दिली.

मलकापूर - कराड हद्दीतील महामार्गाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे;शिवसेनेची मागणी...

Image
मलकापूर - कराड हद्दीतील महामार्गाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे;शिवसेनेची मागणी... कराड दि.12-पुणे बेंगलोर महामार्गावरील मलकापूर व कराड हद्दीतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या हद्दीतील रस्त्याची डांबरीकरण करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने संबंधित कंपनीकडे देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की मलकापूर-कराड हद्दीतील महामार्गावरील खड्डे व रस्त्याची दुरावस्था तसेच प्रचंड प्रमाणात होत असलेले धुळीचे प्रदूषण याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने ना. नितीन गडकरी तसेच डी. पी. जैन कंपनीला निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. दि.२७ जुलैला ना. गडकरी यांना पाठवलेल्या पत्रावर ३१ जुलैला नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने तात्काळ सदर रस्ता मेंटेन करावा अन्यथा अपघात झाल्यास मोटार वेहिकल ऍक्टनुसार संबंधित कंपनी व कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहील असे निर्देश दिले. त्यानुसार कंपनीला पुन्हा स्मरणपत्र देत सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने चालू करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.  सदर निवेदनावर उपजिल्हाप्...

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी...

Image
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दोन लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी... कराड दि.12-भारत जोडो यात्रानंतर काँग्रेस ने संघटन वाढीसाठी मोठी तयारी केल्याचे दिसते. याचं अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदार संघात काँग्रेसची ताकद वाढीसाठी निरीक्षक म्हणून पक्षातील जेष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली आहे त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली असून त्यानुसार आ. पृथ्वीराज चव्हाण दोन्ही लोकसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर देशात काँग्रेस चे वातावरण निर्मिती झाली व त्यानंतर कर्नाटक मध्ये बहुमताने काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. याचं अनुषंगाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी निवडणूक लढविण्याची तयारी असली तरी काँग्रेस पक्षाने 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा मुंबई येथे काँग्रेस मुख्यालयात घेतला होता. त्यानंतर आता जेष्ठ नेत्यांकडे प्रत्येकी 2 लोकसभा मतदार संघाच...

महाविकास आघाडीत काँग्रेस एक नंबरवर असेल:आ.भाई जगताप; काँग्रेस आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ, फुटीरतावाद्यांबद्धल जनतेत प्रचंड चीड...

Image
महाविकास आघाडीत काँग्रेस एक नंबरवर असेल:आ.भाई जगताप; काँग्रेस आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ, फुटीरतावाद्यांबद्धल जनतेत प्रचंड चीड... कराड, दि. 11 (प्रतिनिधी) - गेल्या एक-दीड वर्षात राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना व राष्ट्रवादीमधील फुटीबाबत लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. देशात विरोधकांचे दबावतंत्र, पक्षांतर्गत राजकारणाचे परिणाम कर्नाटकात दिसून आले. तसेच परिणाम महाराष्ट्रातही दिसतील. त्याचबरोबर ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतही दिसून येतील. परंतु, राज्यात अद्याप महाविकास आघाडी अबाधित महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर असेल, असा विश्वास सातारा लोकसभा मतदार संघ निरीक्षक आ. भाई जगताप यांनी व्यक्त केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा अल्पना यादव, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस एड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, रणजीतसिंह देशमुख, निवास थोरात उपस्थित होते. आ. भाई जगताप म्हणाले, राज्यात सध्या महाविकास आघाडीच...

कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड...

Image
  कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड... रेठरे बुद्रुक दि.11: येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतीला उर्जितावस्था आणण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून सातत्याने ऊसविकास मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.  परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी गजेंद्र पाटील (आटके) यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषी परिषदेचे संचालक धनाजीराव पाटील, धोंडिराम कदम, जयवंत नांगरे, सुजीत मोरे, ब्रिजराज मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील,...

कराड नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज आता फलटण मुख्याधिकारी यांच्याकडे....

Image
  कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना कराड पाटण नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडण्याचे आदेश... कराड दि.10 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी जूनमध्ये शंकर खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी पदाचा चार्ज ही स्वीकारला. काही त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये त्यांची पदोन्नती झाली. या पदोन्नतीनुसार त्यांची अकोला महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाल्याची आदेश काढण्यात आले. त्यावेळी खंदारे यांनी या पदोन्नती बाबत दिलेल्या ठिकाणी चार्ज घेण्याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली नव्हती. त्याबाबत आज पर्यंत यावर चर्चा सुरू होती. मात्र गेली तीन दिवस झाले खंदारे मुंबई येथे तळ ठोकून होते. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आज त्यांच्याकडे असणारा कराड नगरपरिषदेचा व पाटण नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडण्याबाबतचे आदेश सातारा जिल्हाधिकारी यांनी काढले. दरम्यान आज आलेल्या आदेशानुसार मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना त्यांच्याकडे असलेला कराड व पाटण येथील मुख्याधिकारी पदाचा चार्ज व त्यातून क...

कराड नगरपरिषद आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे उद्घाटन...

Image
  कराड नगरपरिषद आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे उद्घाटन... कराड दि.10 (प्रतिनिधी)  "मेरी माटी, मेरा देश" (मिट्टी को नमन, वीरो को वंदन) या अभियाना अंतर्गत कराड शहरातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील नगरपरिषद आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे माजी नगरसेवक तसेच मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थिताना आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांनी 'पंच प्रण (शपथ)' दिली. उद्घाटन झालेल्या शिलाफलकावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीरांच्या नावांचा समावेश आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारुख पटवेकर, प्रदीप जाधव, रणजीत पाटील, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, उपमुख्याधिकारी विशाखा पवार, सहा. नगर रचना अधिकारी अंकिता पवार, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य ...