कृष्णा’च्या महिला शेतकरी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना;'व्हीएसआय'चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर...
कृष्णा’च्या महिला शेतकरी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना;'व्हीएसआय'चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर... शिवनगर, दि.19 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसीय शिबीरासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या १५ महिला शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्यांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला शेतकर्यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे येथे आयोजित शिबीरासाठी रवाना झालेल्या महिला शेतकऱ्यांना संचालक संजय पाटील, बाजीराव निकम, विलास भंडारे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, संजय पवार, सेक्रेटरी मुकेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या. शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यव...