Posts

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 334 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली

Image
  सातारा जिल्ह्यात आज 4 बाधितांची नोंद ... कराड दि.24 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात फलटण-2,सातारा-2 असे 4 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 15 सक्रिय रूग्ण आहेत.  नमूने-चाचणी-46 (एकूण-26 लाख 26 हजार 106) आज बाधित वाढ- 4 (एकूण-2 लाख 80 हजार 748) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 881) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-15 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -0 देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 334 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 1 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 16 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात 23 हजार 193 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

आ. बाळासाहेब पाटील यांनी सपत्नीक घेतले खंडोबा म्‍हाळसाकांतचे दर्शन....

Image
  आ. बाळासाहेब पाटील यांनी सपत्नीक घेतले खंडोबा म्‍हाळसाकांतचे दर्शन.... कराड दि.24- दिपावली व लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी पत्नी सौ.जयमाला पाटील व चिरंजीव जशराज पाटील(बाबा) यांच्यासमवेत पाल ता.कराड येथील श्री खंडोबा-म्हाळसाकांताचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्या उपस्थितीत चैत्यन्यपूर्ण वातावरणात सकाळची आरती संपन्न झाली. याप्रसंगी खंडोबा म्हाळसाकांत देवस्‍थान कमिटीचे प्रमुख मानकरी देवराजदादा पाटील, सह्याद्रि कारखान्याचे संचालक सर्जेराव खंडाईत, माजी संचालक भास्‍करराव गोरे, उध्दवराव फाळके यांचेसह ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.

रिमांड होम मधील अनाथ मूलांची दिवाळी उत्साहात;दादा शिंगण यांचा उपक्रम.....

Image
  रिमांड होम मधील अनाथ मूलांची दिवाळी उत्साहात;दादा शिंगण यांचा उपक्रम..... कराड दि.24 (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते व मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण यांच्या पुढाकाराने आज येथील रिमांड होम मधील अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील यांच्या हस्ते या मुलांना कपडे व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुलांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. तसेच मलकापूर मदरशातील मुलांनी अनाथ मुलांसोबत फराळाचा आस्वाद घेतला. येथील रिमाइंड होम मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण हे आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने रिमांड होम मधील अनाथ मुलांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात. हे 22 वर्ष आहे. सातत्याने या अनाथ मुलांना कपडे भेटवस्तू, दिवाळी फराळ देऊन त्यांचा सन्मान करतात. सामाजिक बांधिलकी जोपासत गेले अनेक वर्षे हा उपक्रम दादा शिंगण राबवत आले आहेत. क्रांतिवीर माधवराव जाधव बाल निरीक्षण गृहात असणारी ही अनाथ मुले दादा शिंगण यांनी केलेल्या सन्मानाने भारावून जातात. दीपावलीच्या आजच्या या उत्सव...

कराडात मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी भेट देऊन कष्टकर्‍यांचा सन्मान...

Image
  कराडात मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने  दिवाळी भेट देऊन  कष्टकर्‍यांचा सन्मान... कराड दि.23(प्रतिनिधी) दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील कष्टकऱ्यांची दिवाळी आज कराडच्या मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने गोड करण्यात आली. शहरातील सर्व गॅस वितरक कर्मचारी, आशा वर्कर, कराड नगर परिषदेच्या घंटागाडीवर काम करणारे कर्मचारी तसेच महिला बांधकाम कामगार यांना प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भानुदास वास्के, उपाध्यक्ष दत्तात्रय तारळेकर, कार्याध्यक्ष माणिक बनकर, सतीश लोखंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शाळा क्रमांक 9 मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शीरिष शंभुस यांनी आशा वर्कर यांनी कोविड काळात केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक केले तसेच कराड नगरपालिकेतील घंटागाडी कर्मचारी तसेच शहरात गॅस वितरण करणारे कर्मचारी यांच्या देखील कष्टाचे यावेळी उपस्थितांनी कौतुक करुन उपस्थित मान्यवरांनी या सर्व कष्टकरी कामगारांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक बनकर यांन...

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 994 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली

Image
  सातारा जिल्ह्यात आज 3 बाधितांची नोंद ... कराड दि.23 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात कराड-1,फलटण-1,सातारा-1 असे 3 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 15 सक्रिय रूग्ण आहेत तर एका रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.  नमूने-चाचणी-85 (एकूण-26 लाख 26 हजार 60) आज बाधित वाढ- 3 (एकूण-2 लाख 80 हजार 744) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 881) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-15 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -1   देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 994 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 2 हजार 601 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात 23 हजार 432 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

कराडात वीस एकरातील ऊस जळून खाक;अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न....

Image
कराडात वीस एकरातील ऊस जळून खाक;अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न.... कराड दि.23-(प्रतिनिधी) येथील बैल बाजार ते मलकापूर रोड दरम्यान असणाऱ्या प्रीतिसंगम मंगल कार्यालयाच्या पाठीमागील सुमारे वीस एकरातील ऊस शेतीला लागलेल्या आगीमुळे मोठा नुकसान झाला आहे. दुपारी तीन वाजता ही आग लागल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले व तात्काळ अग्निशामक दलास त्यांनी संपर्क केल्याने कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊस क्षेत्रापर्यंत गाडी जाण्यासाठीचा मार्ग नसल्याने उसाच्या मध्यभागातील आग विझवता आली नाही. मलकापूर गोळेश्वर हद्दीत हे शेती असून दुपारी आग लागल्यानंतर लोकांनी तात्काळ पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र जळून खाक झाले. चार ते पाच शेतकऱ्यांच्या या ऊस शेतीला आग लागल्याने मोठा नुकसान झाला आहे. अजूनही आग सुरूच असून शेतकरी आग विझवण्याचा शर्तीचा प्रयत्न करीत आहेत. या परिसरात गोळेश्वर हद्दीपर्यंत ऊस क्षेत्र आहे.लहान मुलांनी फटाके फोडल्याने आग लागल्याची शक्यता तेथिल नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान अद्याप ऊसाचे गा...

कराडात 'आनंदाचा शिधा'चे आॅफलाईन वाटप;लाभार्थ्यांची दिवाळी झाली गोड...

Image
'आनंदाचा शिधा'चे वाटप करताना खरेदी विक्री संघाच्या स्वस्त धान्य दूकानातील कर्मचारी.... कराडात 'आनंदाचा शिधा'चे आॅफलाईन वाटप;लाभार्थ्यांची दिवाळी झाली गोड... कराड दि.23-(प्रतिनिधी)  राज्य सरकारने दिवाळीनिमित्त प्राधान्यक्रम शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानांतून आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट दिले असून कराड शहरातील सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.प्रारंभी आॅनलाईन पध्दतीने पाॅजमशिनला विलंब लागत असल्याने किट वाटपाला विलंब लागत असल्याने प्रशासनाने आॅफलाईन पध्दतीने या किटचे वाटप सूरू केले आहे.अनेक  गरजूनी आज याचा लाभ घेतलेला आहे.  आनंदाचा शिधा संपूर्ण राज्यात वितरीत करण्यात आला.मात्र वेळेअभावी अनेक ठिकाणी शिधा पोहचण्यास विलंब झाला.कराडात हा शिधा पोहच झाल्यानंतर स्वस्त धान्य दूकानदारांची थोडी कसरत झाली.नियमित धान्य वाटप व शिधा वाटप करताना सबंधित लाभार्थ्याचा दोन वेळा थंब घ्यावा लागला.मात्र सर्वर संथ झाल्याने विलंब होऊ लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.याची दखल तात्काळ पूरवठा विभागाने घेतली व शिधा वाटप आॅफलाईन पध्दतीने करण्याचे ...