कराडात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेची तयारी सूरू.....
कराडात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी विविध भागात जलकूंड.... कराड दि.24 (प्रतिनिधी) कराड नगरपालिकेच्या वतीने यावर्षीही गणेश उत्सवात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यासाठी शहरात विविध भागात 21 ठिकाणी जलकुंड ठेवण्यात येणार आहेत. गतवर्षी या पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पाच हजार गणेश मूर्तींचे जलकुंडात नागरिकांनी विसर्जन केले होते. याही वर्षी नगरपरिषदेने शहरातील विविध भागात जलकुंड ठेवण्याचे नियोजन केले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तींचे जलकुंडात विसर्जन करावे असे आव्हानही नगरपालिकेने केले आहे. कराड शहरात पर्यावरण पूरक गणेश विसर्जना बरोबर मूर्ती दान संकल्पनेलाही मोठा प्रतिसाद नागरिक देत असतात. गतवर्षि नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तीचे विधीवत पूजा करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे गणेश मूर्ती दान केल्या होत्या. यासाठी कराड नगर परिषदेने शहरात विविध प्रभागामध्ये गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था केली होती. या संकल्पनेस नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. याही वर्षी नागरिकांनी तसाच प्रतिसाद द्यावा असेही आव्हान नगर परिषदेन...