राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य राहील-ना.शंभूराज देसाई...
राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य राहील-ना.शंभूराज देसाई... देसाई कारखान्याचे चांगल्या कामकाजाबद्दल केले कौतुक.. . लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न... दौलतनगर, दि. 31: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उत्तम नियोजनामुळे विस्तारीकरण चे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून गत वर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला आहे. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक समस्यांचा असून या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य राहिल असे प्रतिपादन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले. दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे डॉ.दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, बळीराम साळुंखे, शंकरराव पाटील, विजय सरगडे, सर्जेर...