Posts

Showing posts from May, 2024

कराड पालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई;मुख्याधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल; यशवंत आघाडीचे टाळे ठोको आंदोलन स्थगित...

Image
कराड पालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई;मुख्याधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल... कराड दि.29-कराड नगरपालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अन्यथा त्यांची गाढवावरून दिंड काढून नगरपालिकेस टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर आज आज मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने यशवंत विकास आघाडीचे टाळे ठोको आंदोलन स्थगित केल्याचे आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी माध्यमांना सांगितले. यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कराड नगरपालिकेच्या कारभाराविषयी व पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आज प्रत्यक्ष नगरपालिकेत यादव समर्थकांनी गाढव आणून आंदोलन केले मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. नगररचना विभागातील स्वानंद शिरगुप्पे व सचिन पवार यांच्यावरील कारवाईचा अधिकार हा मुख्याधिकारी यांच्याकडे नसल्याने त्यांची तक्रार नगररचना विभाग सातारा यांच्याकडे कारवाईसाठी पाठवली आहे. तर प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत निय...

नगरपालिकेतील त्या अधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा टाळे ठोक आंदोलन; राजेंद्रसिंह यादव...

Image
नगरपालिकेतील त्या अधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा टाळे ठोक आंदोलन; राजेंद्रसिंह यादव... कराड दि.28-कराड नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात नगरपालिकेचे पर्यायाने कराडकरांचे फार मोठे नुकसान झाले असून नगरपालिकेत अंदाधुंद कारभार सुरू आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा कराड नगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल व नगररचना विभागातील त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढण्यात येईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी यशवंत विकास आघाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते.  यादव पुढे म्हणाले की, कराड नगर परिषदेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत सव्वादोन वर्षापूर्वी संपली, गेल्या दोन-सव्वादोन वर्षात कराड नगर परिषदेत प्रशासकीय कारभार सुरु आहे. या कालावधीत विविध विभागातील अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारी व्यवस्था नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मध्ये बेदरकार वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत गेली. अधिकाऱ्यांच्या बेफिकीर व मनमानी कारभाराचा सर्वसामान्य कराडकरांना ...

कृष्णा हॉस्पिटलमध्ये जागतिक नर्सेस दिन उत्साहात साजरा...

Image
कृष्णा हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ परशुराम नायकवडी यांना सर्वोत्कृष्ट नर्स पुरस्काराने सन्मानित करताना वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर.... कृष्णा हॉस्पिटलमध्ये जागतिक नर्सेस दिन उत्साहात साजरा... कराड दि.25: येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये जागतिक नर्सेस दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत असणारे परशुराम नायकवडी यांना सर्वोत्कृष्ट नर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया कराड शाखेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी चिफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट नर्सिंग सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परशुराम नायकवडी यांना बेस्ट नर्स ॲवॉर्डने, तर महेश वेल्हाळ व शुभ...

कराडात हत्तेसाठी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी गजाआड ; तीन बंदुकांसह शस्त्रे जप्त...

Image
हत्तेसाठी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी गजाआड ; तीन बंदुकांसह शस्त्रे जप्त... कराड दि.22- कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने विद्यानगर येथे इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उधळत रेकॉर्डवरील पाच जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. या टोळीकडून २ दुचाकीसह ३ देशी बनावटीची पिस्तुले व घातक हत्यारे असा मिळून ३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेली संशयितांची टोळी इचलकरंजीतील 'गेम प्लॅन' साठी पैसे जमविण्याच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विद्यानगर-सैदापूर (कराड) येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार, सोमवार दिनांक २० मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरामध्ये गस्त घालत होते. यादरम्यान विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याचे तयारीत असून तात्काळ त्याठिकाणी जावून कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. याबाबतची...

कराड तालुका पोलीसांनी बेकायदेशीर अवैद्य गुटखा पकडला; साडे तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त...

Image
कराड तालुका पोलीसांनी बेकायदेशीर अवैद्य गुटखा पकडला; साडे तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त... कराड दि.18-कराड चांदोली रोडवर बेकायदेशीर गुटख्याची अवैध वाहतूक कराड तालुका पोलिसांनी रोखले असून सुमारे 13 लाख 64 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल एका आरोपीसह पोलिसांनी हस्तगत केला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचंल दलाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ/गुटखा आणि दारुबंदी कारवाई करणेकामी विशेष मोहिम आयोजित करुन कारवाई करणेकामी सुचना दिल्या होत्या. सदर कारवाई अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शानाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेस गोपनीय माहिती मिळाली की कराड उंडाळे रोडने एक छोटा हत्ती वाहन अवैद्य गुटखा घेवुन जाणार आहे त्या माहितीची खातरजमा करुन कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप सो यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, सतीश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे तस...

वारुंजी जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना पुलावरील केबल झाल्या खराब; पाणी पुरवठा उशिरा होणार...

Image
  वारुंजी जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना पुलावरील केबल झाल्या खराब; पाणी पुरवठा उशिरा होणार... कराड दि.15-(प्रतिनिधी) शहराला वारुंजी येथील जॅकवेल मधून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शहरातून जॅकवेल पर्यंत विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य केबल मध्ये बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य केबल मधून जॅकवेल साठी विद्युत पुरवठा न झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण भरू शकल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळचा पाणीपुरवठा झाला नाही शिवाय सायंकाळचा पाणीपुरवठा उशिरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना पुलावरील मुख्य केबल खराब झाल्याने पुढे जॅकवेल पर्यंत विद्युत पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) कर्मचाऱ्यांसह जॅकवेल पर्यंतच्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकल्या. त्यानंतर कोयना पुलानजीक मुख्य केबलची लाईन विद्युत खांबावरून ज्या ठिकाणी पुढे जाते त्या ठिकाणची ही सकाळपासून तपासणी सुरू केली होती. मात्र तपासण्याअंती कोयना पुलावरून पास झाल...

पोदार कराड स्कूलचे सीबीएसई बारावी आणि दहावी परीक्षेत घवघवीत यश....

Image
पोदार कराड स्कूलचे सीबीएसई बारावी आणि दहावी परीक्षेत घवघवीत यश.... कराड दि.14-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२३-२४ च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कराडमधील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य 'पोदार इंटरनॅशनल स्कूल'मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तूरा रोवला आहे.शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे.  यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून कु. रुही साळुंखे ही ८५% मिळवून प्रथम, कु. आरोही कदम ही ८४.६० % मिळवून द्वितीय तर कु. स्नेहलता भोसले ही ७९.६० % मिळवून तृतीय आली आहे. दहावी परीक्षेत प्रविष्ट झालेले सर्वच वि‌द्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गार्गी पवार हिने याने ९८.६० % मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे, तर द्रव्य छाजेड शहा याने (९७.४०%) दुसरा क्रमांक, राशी ओसवाल आणि समीक्षा संकपाळ (९७.२० %) यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. या वर्षीही दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा जोपासत विविध विषयात प्राविण्य प्राप्त ...

कृष्णा विश्व विद्यापीठाचा गुरुवारी १२ वा दीक्षांत सोहळा...

Image
कृष्णा विश्व विद्यापीठाचा गुरुवारी १२ वा दीक्षांत सोहळा... पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची प्रमुख उपस्थिती; १०४२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान... कराड, दि.१४ : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत सोहळा गुरुवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर उपस्थित राहणार असून, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.  या सोहळ्याला कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील १०४२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्...

'कृष्णा'च्या माध्यमातून 'रोटरी आशा एक्सप्रेस' धावणार गावोगावी

Image
'कृष्णा'च्या माध्यमातून 'रोटरी आशा एक्सप्रेस' धावणार गावोगावी... कॅन्सर निदानासाठी अनोखा उपक्रम; अत्याधुनिक साधनांनी सज्ज फिरत्या बसचे लोकार्पण.... कराड, ता. १२ : अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. पण लवकर निदान आणि वेळेत उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र कॅन्सरच्या भितीमुळे अनेकजण तपासणीकडे कानाडोळा करतात. यावर उपाय म्हणून रोटरी क्लबने 'रोटरी आशा एक्सप्रेस' ही फिरती कर्करोग तपासणी बस तयार केली आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून ही 'रोटरी आशा एक्सप्रेस' सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाणार आहे.  याठिकाणी कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञांची टीम जनजागृती करणार असून, अद्ययावत साधनांनी सज्ज असलेल्या या मोबाईल बसच्या माध्यमातून नागरिकांची मोफत कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने तोंडाचा कॅन्सर, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग व कान-नाक-घसा कर्करोगाची मोफत तपासणी केली जाणार आहे.  रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वॉलसॉल (यु. के.), द रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल यांच्य...

सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी 63.16 टक्के मतदान...

Image
  सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी 63.16 टक्के मतदान... सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदार संघात 67.59 टक्के... सर्वात कमी मतदान पाटण मतदार संघात 56.95 टक्के... 64.98 टक्के पुरुष तर 61.28 टक्के स्त्री मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क... सातारा 8:- 45- सातारा लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी शांततेत व सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियमध्ये वृद्ध, तरुणांनी, नव मतदार, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान 261- पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये 45 सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदानाच्या टक्केवारी मध्ये वाढ झाली असून आतापर्यंत झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. यामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे. 256 वाई मतदारसंघात ...

उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून द्या;खा. सुनील मेंढे...

Image
उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून द्या;खा. सुनील मेंढे... कराड दि.4-लोकसभेची ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्यामुळे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे यांनी केले.  भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाठार येथे बैठक झाली त्यावेळी खा.मेंढे बोलत होते. यावेळी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील-वाठारकर, माजी जि. प. सदस्य गणपतराव हुलवान उपस्थित होते. खासदार मेंढे पुढे म्हणाले की, या देशात काँग्रेसने आपल्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार केला. गरिबी हटाव म्हणून लोकांना गरीबच ठेवले. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. दर ६ महिन्याला राहुल गांधी परदेशात जातात. त्यांना शेतीचे ज्ञान नाही. मोदीजी एक दिवससुद्धा सुट्टी घेत नाहीत. संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहेत. प्रत्येक क्षण देशातील जनतेसाठी घालवत आहात. सर्व योजना य...

उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा; ना.चंद्रकांतदादा पाटील...

Image
  उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा; ना.चंद्रकांतदादा पाटील... कराड, दि. 2 लोकसभेची निवडणूक ही देशाचे धोरण काय असावे, हे ठरविणारी निवडणूक आहे. यावेळीही मोदीच निवडून येणार याची खात्री विरोधकांनाही आहे. त्यामुळे ‘अबकी बार ४०० पार’चे ध्येय्य साध्य करण्यासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी देशाचे हित बघणारे मोदी सरकार पुन्हा आणण्यासाठी, सातारा लोकसभेतून भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. भाजप महायुतीचे उमेदवार खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गोवारे, ता. कराड येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, गोवारे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश आज जगात पाचव्या स्थानावर आला आहे. मोदींनी दहा वर्षांच्या काळात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सर्वसामान्यां...

कराडात शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न...

Image
शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन आयोजित कराडमध्ये सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न... कराड दि.2:-राष्ट्रीय एनजीओ महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन (महाराष्ट्र राज्य) शाखा- कराड व शेठ नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा काल महाराष्ट्र दिनी नगर परिषद शाळा क्रमांक ७/१२ येथे अनेक मान्यवरांच्या व प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत मोठ्यााा उत संपन्न झाला.  या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वधूवरांच्या समस्त आप्तेष्ट नातेवाईकांनी शाळेच्या पटांगणातील सजलेला भव्य मंडप गजबुजून गेला होता. वरांच्या मिरवणुकीच्या क्षणांनी बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. धार्मिक रीती रितीरिवाजाप्रमाणे वधू-वरांच्या लग्नविधीचे सर्व सोपस्कार करून वधू-वरांना विवाह पोषाख, वधूसाठी मनी मंगळसूत्र, जोडवे, संसार उपयोगी पाच भांडी अशा वस्तू देऊन उपस्थितांना भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती. यावेळी संसार सुखाच्या बंधनात प्रवेश करू पाहणाऱ्या नवदांपत्यास ज्येष्ठ व प्रतिष्ठित मान्यवरांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. या कार्...