वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण
वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 21 : वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा, असे स्पष्ट आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गोटे (ता. कराड) येथे गोटे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन, सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास सौ. सत्वशीला चव्हाण, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, सुनंदा पाटील, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अमित जाधव, संजय तडाखे, कराडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, सौ. मंगल चव्हाण, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण, झाकीर पठाण, गोटेच्या सरपंच वहिदा शेख, उपसरपंच कोमल लादे, धोंडेवाडीचे सरपंच रमेश भोसले, जगन्नाथ भोसले यांच्यासह अन...