कराड नगरपरिषदेसाठी 14 अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल नाही
कराड नगरपरिषदेसाठी 14 अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल नाही कराड, दि. 14 - कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी भाजपाकडून नगरसेवक पदासाठी 9 तर लोकशाही आघाडी कडून 2 व अपक्ष 3 जणांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रभाग 3 मधून पवार ज्योती अधिकराव (अपक्ष), प्रभाग 4 मधून मोहिते स्वाती रमेश (भाजप), प्रभाग 4 मध्ये रामुगडे शिवाजी कांतीसुरत (भाजप), प्रभाग 7 मध्ये कुलकर्णी अजय अरविंद (अपक्ष), प्रभाग 8 मध्ये विभूते विनायक शिवलिंग (भाजप), प्रभाग 9 मध्ये साळुंखे विद्याराणी घनश्याम (लोकशाही आघाडी कराड शहर), प्रभाग 9 मध्ये साळुंखे प्रताप घनश्याम (लोकशाही आघाडी कराड शहर), प्रभाग 10 मध्ये भोपते विक्रम राजाराम (भाजप), प्रभाग 11 मध्ये रैनाक प्रसाद नरेंद्र (भाजप), प्रभाग 13 मध्ये हूलवान स्मिता रवींद्र (भाजप), प्रभाग 13 मध्ये शाह निखिल प्रमोद व शाह गिरीश बाबूलाल (भाजप), प्रभाग 14 भोंगाळे प्रियांका दत्तात्रेय (अपक्ष), प्रभाग 14 मधून पवार महादेव बळवंत (भाजप) आदींनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. अशी माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्ण...