कराडला रसायन युक्त बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...
कराड शहर पोलीस ठाणेची मोठी कारवाई... रसायन युक्त बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश... तीन आरोपी अटक;एकुण 11,38,550/- रुपये किंमतीचे बनावट देशी दारु बनवण्याचे साहीत्य, रसायन युक्त बनावट देशी दारु जप्त कराड, दि. 15 - सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए ताशिलदार यांना कराड शहरात बेकायदेशिर अवैद्य धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीत मोठी कारवाई करत मानवी जीवितास अपायकारक रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपी अटक करण्यात आले असुन त्यांचे ताब्यातुन एकुण 11,38,550/- रुपये किंमतीची रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवण्याचे साहीत्यासह वनावट देशी दारु जप्त करण्यात आली आहे. दिनांक 10/09/2025 रोजी कर्तव्यावर असताना सांयकाळी 6 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार यांनी सपोनी राजेश माळी व पथकास कराड शहर पोलीस ठ...