कराड पालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई;मुख्याधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल; यशवंत आघाडीचे टाळे ठोको आंदोलन स्थगित...
कराड पालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई;मुख्याधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल... कराड दि.29-कराड नगरपालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अन्यथा त्यांची गाढवावरून दिंड काढून नगरपालिकेस टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर आज आज मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने यशवंत विकास आघाडीचे टाळे ठोको आंदोलन स्थगित केल्याचे आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी माध्यमांना सांगितले. यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कराड नगरपालिकेच्या कारभाराविषयी व पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आज प्रत्यक्ष नगरपालिकेत यादव समर्थकांनी गाढव आणून आंदोलन केले मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. नगररचना विभागातील स्वानंद शिरगुप्पे व सचिन पवार यांच्यावरील कारवाईचा अधिकार हा मुख्याधिकारी यांच्याकडे नसल्याने त्यांची तक्रार नगररचना विभाग सातारा यांच्याकडे कारवाईसाठी पाठवली आहे. तर प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत निय...