केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यानगरमध्ये उद्या ५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन...
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यानगरमध्ये उद्या ५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन... कराड, दि 8: विद्यानगर - सैदापूर (ता. कराड) येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आणि भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, श्रीनिवास जाधव व प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यमार्ग १४२ अंतर्गत विद्यानगर – सैदापूर (ता. कराड) येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता विद्यानगर भाजीमंडईसमोर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते कराड दक्षिण मतदारसंघातील लाभार्थ्यांना आयुष्मान ...