Posts

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींना थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मंजूर...

Image
 माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींना थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मंजूर... राज्यातील 383 नगरपरिषदा/नगरपंचायतींना मिळणार थकीत अनुदान... कराड व मलकापूर नगरपालिकेला अनुक्रमे रु. ३८ लाख व ५८ लाख मिळणार... कराड: दि. १२-राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाकरिता राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्क सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते. राज्यातील एकूण ३८३ नगरपरिषदा/नगरपंचायतीं यांना 2018-19 पासून हे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मिळाले नव्हते. यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे मागणी केली होती. शासनस्तरावर पाठपुरावा केल्यामुळे राज्यातील ३८३ नगरपरिषदा/नगरपंचायतींना 2018-19 वर्षातील थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मिळणार आहे. राज्यात एकूण 241 नगरपरिषदा व 144 नगरपंचायती अशा एकूण 383 नगरपरिषदा/नगरपंचायती आहेत. शासनाने यापूर्वी राज्यातील महानगरपालिकांना 1% मुद्रांक शुल्क अनुदान वितरित केले आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्व नगरपरिषदा/नगरपंचायती...

कराडच्या भरवस्तीत पिस्तूलसह एक जण जेरबंद..

Image
  कराडच्या भरवस्तीत पिस्तूलसह एक जण जेरबंद.. कराड दि.१० (प्रतिनिधी) बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी कराडच्या कृष्णा पॅलेस हॉटेल येथे एक जण आला असता डीवायएसपी अमोल ठाकरे यांच्या पथकाने सापळा रचून त्यास पिस्तूल सह ताब्यात घेतल्याची घटना आज घडली आहे.याप्रकरणी वाघेश्वर मसूर येथील शंकर बधू यास पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सातारा जिल्हा पो.प्रमुखांनी जिल्हयात अवैध शस्त्र, बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहिम तीव्र केली आहे. त्या अनुषंगाने आज येथिल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना त्यांना मिळालेल्या माहितीवरुन शंकर बदु रा. वाघेश्वर मसुर (ता.कराड) हा बेकायदा बिगर परवाना पिस्टल विक्रीकरीता कराडच्या हॉटेल कृष्णा पॅलेस येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनूसार त्यांनी कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून, त्यांना सदर माहिती देऊन सापळा रचुन कारवाई करणेबाबत सूचना केल्या. पोलीस पथकाने लागलीच दोन पंच तसेच कार्यालयातील इतर स्टाफसह हॉटेल कृष्णा पॅलेस या ठिकाणी दोन टिम तयार करून...

कराड जवळ टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखाचा गूटखा पकडला...

Image
कराड जवळ टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखाचा गूटखा पकडला... कराड दि.9 (प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील वराडे गावचे हद्दीत तळबीड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 25 लाख 12 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर कराड तालुक्याचे हद्दीत रात्री 11 ते 4 रात्र गस्त सुरू असताना गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना गुटख्याची वाहतुकी संदर्भात माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर आर वरोटे तसेच पो.काॅ.निलेश विभुते, पो.काॅ. प्रवीण गायकवाड यांनी तासवडे टोल नाका येथे थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम एच 14 के क्यू 4187 हा टोल भरून जात असताना त्यास थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित टेम्पो न थांबता तसाच महामार्ग वरून पुणे बाजूकडे भारधाव वे...

सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमाव बंदी आदेश लागू...

Image
  सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमाव बंदी आदेश लागू... सातारा , दि. 9 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारीत अध्यादेश ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) व 37 (1) (3) अन्वये दिनांक 20 जून 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे. सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्य तसेच ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला पाणी टंचाईसदृश गावांचा आढावा...

Image
  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला पाणी टंचाईसदृश गावांचा आढावा...  कराड दि.9- : सद्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कराड तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे अशा गावांचा आढावा आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, तालुका गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार बी. के राठोड, पी डब्लू डी, एम जी पी आदी विभागांचे अधिकारी आदींच्यासह मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, निवास थोरात, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, रमेश देशमुख, राजेंद्र चव्हाण आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.  यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील टंचाई सदृश गावांचा गावनिहाय आढावा घेतला. त्या गावातील सद्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच उपस्थित असणाऱ्या त्या त्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या जाणून घेत त्याप्रमाणे सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांन...

कराडच्या प्रीतीसंगमात बूडून बारावी पास यूवतीचा मृत्यू...

Image
  कराडच्या प्रीतीसंगमात बूडून बारावी पास यूवतीचा मृत्यू;काटरे-बनसोडे परिवारावर शोककळा... कराड दि.8-(प्रतिनिधी) येथिल कृष्णा कोयना नदीच्या प्रीतीसंगमात सेजल बनसोडे (वय १८) यूवतीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांयकाळी घडली आहे. सायंकाळी घडलेल्या या घटनेने कृष्णा घाठावर एकच खळबळ उडाली असुन रात्री उशिरा यूवतीचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. सबंधित यूवती कराड यैथिल आपल्या नातेवाईकांकडे आली होती. कूटूंबियासमवेत सांयकाळी घाटावर गेले होते.सेजल नूकतीच बारावीची परिक्षा पास झाली होती.सेजल बनसोडे ही कराड नगरपरिषदेचे वरीष्ठ मुकादम मारूती काटरे यांची भाची आहे. कराड तालुक्यातील रेठरे धरण येथील सेजल बनसोडे (वय १८) ही यूवती येथिल आपल्या नातेवाईकांकडे कराडला आली होती. नातेवाईकांसोबत ती व तीचे कुटुंबीय प्रीतीसंगम घाटावरती फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यातील काही मूली नदीपात्रात उतरून पोहण्याचा आंनद घेत होते. एकूण चार मुली या नदीपात्रात उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते.संगमातील खोल भागात या मूली गेल्यानंतर एका मुलीचा हात इतर मूलींकडून सूटल्याने से...

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवा!-राज्यपाल रमेश बैस...

Image
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवा!-राज्यपाल रमेश बैस... लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न.... मुंबई 8-: महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात संसदीय आणि लोकशाही मूल्यांची रुजवण केली. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, पायाभूत विकास आदी क्षेत्रांत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेशजी बैस यांनी केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन बुधवारी, ७ जून रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा धांडोळा घेणाऱ्या 'दौलत' या चरित्रग्रंथाचे लेखन-संपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले असून बुधवारी मुंबईतील राजभवन येथे या चरित्रग्रंथाचा प्रकाशन स...