Posts

देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 591 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद...

Image
  सातारा जिल्ह्यात 17 कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली... कराड दि.20 (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 17 नव्या बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 147 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 61 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून सध्या 12 रूग्णावर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. तर 3 रूग्ण गंभीर स्वरुपाचे आहेत.एका बाधित रुग्णाचा ऊपचार सूरू असताना मृत्यू झाला आहे. आज   नमूने-चाचणी-147 (एकूण-26 लाख 42 हजार 380) आज बाधित वाढ- 17 (एकूण-2 लाख 81 हजार 88) आज कोरोनामुक्त- 25 (एकूण-2 लाख 74 हजार 279) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 734) उपचारार्थ रूग्ण-61 रूग्णालयात उपचार -12 ---------------------------------------- देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 591 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या देशात 65 हजार 286 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासुन बाधितांची मोठी वाढ होताना दिसत आहे.

‘कृष्णा’तर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त कुसूर येथे 200 जणांची मोफत आरोग्य तपासणी...

Image
  ‘कृष्णा’तर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त कुसूर येथे 200 जणांची मोफत आरोग्य तपासणी...  कराड, दि 20 : जागतिक आरोग्य दिनानिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने कुसूर (ता. कराड) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. सुमारे २०० हून अधिक ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेतला.  विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा फार्मसी महाविद्यालय, कुसूर प्राथमिक आरोग्य केंद्र व कुसूर ग्रामपंचायतींच्या संयुक्त सहकार्यातून पार पडलेल्या या शिबीराचे उद्घाटन सरपंच उदयसिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात ग्रामस्थांची उंची – वजन गुणोत्तर, रक्तदाब, रक्तातील साखर आदी चाचण्या करुन मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, विकास कंक, दिलीप मोरे, सुनील पाटील, सोसायटीचे चेअरमन यशवंत कराळे, व्हाईस चेअरमन नरेंद्र मोरे, सदस्य बाबुराव मोरे, डॉ. विक्रांत हिवरे, प्रा. अमिना शहाजहान, अनुप पाटील, जनसंपर्क अधिकारी सागर पवार, रईस पटेल, शेखर देशमुख, महेश देशमुख, सतीश कांबळे, अपर्णा देसाई, दिपाली कणसे, महेंद्र अलाटे यां...

कराडात दोन झाडांवर वीज कोसळली;तालुक्यात पावसाने शेत-पिकांचे नूकसान....

Image
कराडात दोन झाडांवर वीज कोसळली;तालुक्यात पावसाने शेत-पिकांचे नूकसान.... कराड दि.20 (प्रतिनिधी)कराड शहर व परिसरा बरोबर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. पाभसाने कराड तालुक्यातील काही भागात अनेक पिकांचे नुकसान झाले असून शहरातील  पंताचा कोट व शुक्रवार पेठेत जूने वाॅटर हाऊस येथे वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये असलेल्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेठ घेतला तसेच शाळेच्या इमारतीचे किरकोळ नुकसानही झाले. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली. कराड तालुक्यातील दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विजांच्या कडकटासह आलेल्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कालवडे, बेलवडे, कासार शिरंबे परिसरात गारांसह पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. या परिसरात असणाऱ्या काही केळीच्या बागाही कोलमडून पडल्या आहेत. दरम्यान आज कराड शहरात गुरुवार बाजाराचा दिवस असल्याने मंडई परिसरात बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळा उडाली तर ...

कराड बाजार समिती निवडणूक;दोन्ही पॅनेलचे उमेदवार जाहिर.....

Image
कराड बाजार समिती निवडणूक;दोन्ही पॅनेलचे उमेदवार जाहिर..... कराड दि.20 (प्रतिनिधी) कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलच्या वतीने आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही पॅनेल कडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. ही निवडणुक शेतकरी विकास पॅनल विरूध्द स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेल मध्ये होत आहे. या निवडणूकीत हमाल मापाडी गटातील रयत पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे. या निवडणूकीत एकूण 73 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.यापैकी तब्बल 38 जणांनी माघार घेतली आहे. आता 17 जांगासाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत. शेतकरी विकास पॅनेल- कृषी विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून जगदीश दिनकरराव जगताप, मानसिंगराव वसंत जगदाळे, दयानंद भीमराव पाटील, उद्धवराव बाबुराव फाळके, विनोद रमेश जाधव, दत्तात्रय वसंतराव साळुंखे, जयवंत बबन मानकर, महिला प्रतिनिधी गटातून मालन देवाप्पा पिसाळ रेखाताई दिलीप पवार, इतर मागास प्रवर्गातून फिरोज अली इमानदार इनामदार, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून मारुती आनंदा बुधे, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून मानसिंग आनंदराव...

कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत कराडात पाच व्यापार्‍यांवर कारवाई....

Image
  कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत कराडात पाच व्यापार्‍यांवर कारवाई.... कराड दि.20 (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तुंच्या बंदीची कडक अंमलबजावणी कराडात सूरू करण्यात आली आहे.आज बाजारपेठेत करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत अनेक दूकानांची तपासणी करण्यात येऊन पाच दूकानदारांकडून पंचवीस हजारांचा दंड वसूल करीत सूमारे 82 किलो प्लास्टीकचे साहित्य जप्त करण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनूसार शहरात नगरपरिषद आरोग्य विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आज प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाजारपेठेतील अनेक दूकांनाची तपासणी करून 5 दूकांनावर प्रत्येकी पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बंदी असलेले व प्लास्टीकचा वापर असलेले 82 किलोचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये प्लास्टीक बॅग, स्ट्राॅ, डिश तसेच प्लास्टीकचे बाऊल या वस्तूंचा समावेश आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास बंदी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी कराड नगर परिषदेने सुरू ...

देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 542 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद...

Image
  सातारा जिल्ह्यात 7 कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली... कराड दि.19 (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 7 नव्या बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 122 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 64 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून सध्या 11 रूग्णावर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. तर 3 रूग्ण गंभीर स्वरुपाचे आहेत.एका बाधित रुग्णाचा ऊपचार सूरू असताना मृत्यू झाला आहे. आज   नमूने-चाचणी-122 (एकूण-26 लाख 42 हजार 233) आज बाधित वाढ- 7 (एकूण-2 लाख 81 हजार 71) आज कोरोनामुक्त- 12 (एकूण-2 लाख 74 हजार 254) आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 734) उपचारार्थ रूग्ण-64 रूग्णालयात उपचार -11 ---------------------------------------- देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 542 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या देशात 63 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासुन बाधितांची मोठी वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 949 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे तर 6 को...

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक...

Image
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक... लोकनेते साहेबांना पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने केले विनम्र अभिवादन... दौलतनगर दि.19:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते साहेब यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेची व पालखीची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात बुधवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रेला तालुक्यातील जनतेने चागला प्रतिसाद दिला.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमधील पालखीमध्ये ठेवलेल्या लोकनेते साहेब यांचे पादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी दौलतनगर,ता.पाटण येथे...