Posts

कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक...

Image
  कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक... मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट; डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले यांनी केले स्वागत... कराड,दि.25 : कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. कराडच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, कॅम्पसची पाहणी केली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले पालकमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख या मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी कॅम्पसची पाहणी केली. ...

कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन....

Image
कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.... कराड दि. 25- कराड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन करण्यात आले.  या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, माजी नगरसेवक आप्पा माने, इंद्रजीत गूजर, अशोकराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, झाकीर पठाण  आदी उपस्थित होते.  माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून या नवीन शासकीय विश्रामगृहासाठी २० कोटी २२ लाख ३४ हजार रुपये इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी १५ कोटी ७५  लाख ५२ हजार रुपयांची कामे स्थापत्य स्वरूपाची असून उर्वरित कामे विद्युतीकरण v फर्निचरची आहेत. एकूण ४ मजल्यांच्या या इमारतीमध्ये ३...

कराड विमानतळ एमआयडीसी कडे हस्तांतरण;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Image
  सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी.... कराड विमानतळ एमआयडीसी कडे हस्तांतरण;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.... कराड दि. 25 : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री   स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे  हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार  श...

कराडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Image
कराडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन... कराड दि.24-(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कराड दौऱ्यावर येत असून कराड शहर व परिसरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री समाधी स्थळावर श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उपस्थित राहणार असून त्यानंतर शहरातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. कराड विमानतळावर सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमन होणार आहे. त्यानंतर ते प्रीतीसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बैल बाजार मैदान येथे आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित राहणार आहेत. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर भेदा चौकात छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजना करणार आहेत. त्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेल्या शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासह नविन शासकीय विश्रामग...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड दौऱ्यात घेराओ घालण्यात येणार- दलित महासंघाचा इशारा

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड दौऱ्यात घेराओ घालण्यात येणार- दलित महासंघाचा इशारा... कराड 23 (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.२५ रोजी कराड दौऱ्यात दलित महासंघाचे वतिने 'गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत तसेच २०२२पर्यंतची  गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यात यावीत,'या मागणीसाठी घेराओ घालण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी दिली आहे. या आंदोलनामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांचेसह अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.याचबरोबर सर्व अर्थीक विकास महामंडळाची कर्जमाफी करण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांना करण्यात येणार आहे. सदरचे घेराओ आंदोलन यशस्वी करण्यासाठी दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, उपाध्यक्ष सुरज घोलप, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे, कराड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे ,सुहास पिसाळ, सुर्यकांत काळे आदि परिश्रम घेत आहेत.

कराडात नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन....

Image
  कराडात नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन.... कराड दि.23 (प्रतिनिधी) कराड नगरपरिषदच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नागरीकांच्यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी व या राष्ट्रीय कार्यात नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी जिंगल स्पर्धा, शॉर्ट मुव्ही स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व म्युरल स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी सहभागी होणार्‍यांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून आजच आपली नाव नोंदणी करावयाची आहे.  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScGp5dESPZQUuxXkgzOs9hWQkiDiaLQAYtqmwnRJMV4hfydnA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0 स्पर्धेचे विषय :- १. माझे कराड, माझी जबाबदारी  २. प्लास्टिक बंदी  ३. अपारंपरिक उर्जा स्त्रोत  पारितोषिक :- प्रथम क्रमांक ५०००/-,  व्दितीय क्रमांक ३०००/-,  तृतीय क्रमांक २०००/- व प्रमाणपत्र. ठिकाण - 1. म्युरल स्पर्धा सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महा...

कराडात प्लास्टीक निर्मुलन मोहिमे अंतर्गत दोन व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई....

Image
  प्लास्टीक निर्मुलन मोहिमे अंतर्गत कराडात दोन व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई.... कराड दि.23 (प्रतिनिधी) एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तुंच्या बंदीची कडक अंमलबजावणी कराडात सूरू आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनूसार शहरात आरोग्य विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाजारपेठेतील आर के लिनन कलेक्शन व राजलक्ष्मी रेडिमेड कलेक्शन या दोन दूकांनावर प्रत्येकी पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बंदी असलेले व प्लास्टीकचा वापर असलेले 55 किलोचे साहित्य जप्त करण्यात आले.यामध्ये प्लास्टीक चमचे, स्ट्राॅ, डिश तसेच प्लास्टीकचे आवरण असलेल्या पत्रावळ्यांचा समावेश आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास बंदी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी कराड नगर परिषदेने सुरू ठेवली आहे. या अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने बाजारपेठेत विविध ठिकाणी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. यावेळी  काही दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन दुकानात प्रतिबंध करण्यात आलेले प्लास्टिकच्य...