Posts

जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांनी आधार लिंक न केलेस धान्य बंद होणार....

Image
  रेशन कार्डधारकांनी आधार  लिंक न केलेस धान्य बंद होणार.... सातारा दि.23 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयामार्फत धान्य वितरण करण्यात येते. अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांतील लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावयाचे प्रलंबित आहे. शासन स्तरावरून सततच 2 वर्षे पाठपुरावा करूनही १०० टक्के आधार सीडिंग होत नसल्याने रास्त भाव दुकानदारांमार्फत ई - पॉस मशीनद्वारे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.  जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीचे १०० टक्के आधारचे व ई - केवायसीचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जे नागरिक रेशन धान्याचा लाभ घेतात मात्र रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे  आधार कार्ड  आतापर्यंत लिंक करून घेतले नाही, अशा आधार लिंक नसलेल्या नागरिकांचे रेशन धान्य बंद करावे लागणार आहे.  रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी लाभार्थींनी स्वत: रेशन दुकानात आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जाऊन जोडणी करून घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी आवाहन  केले.   रेशनकार्डला आधार ...

सातारा जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 56 झाली असून सध्या 2 गंभीर रुग्ण आहेत...

Image
  सातारा जिल्ह्यात आज 5 बाधिताची वाढ ... कराड दि.23 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 5 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 3 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 56 झाली असून सध्या 2  गंभीर रुग्ण   तर 7 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.  सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-2,  कराड-1,  खंडाळा- 0, खटाव- 0, कोरेगाव-0, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-1, वाई-1, इतर 0 असे 5 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी-240 (एकूण-26 लाख 21 हजार 747) आज बाधित वाढ- 5 (एकूण-2 लाख 80 हजार 615) आज कोरोनामुक्त- 3 (एकूण-2 लाख 73 हजार 820) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 719) उपचारार्थ रूग्ण-56 गंभीर रुग्ण--2 रूग्णालयात उपचार -7 सातारा जिल्ह्यात आज 6  जनावरांचा मृत्यु झाला ..... 71 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव; 82 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी... सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा व जावली  असे 9 तालुक्यातील 71 ग...

मुथूट फिनकाॅर्पच्या नेत्र तपासणी शिबिरास कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

Image
 शिबिरात डोळ्यांची तपासणी करताना डाॅ.योगिता पाटील.... मुथूट फिनकाॅर्प च्या नेत्र तपासणी शिबिरास कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... कराड दि.23 (प्रतिनिधी) मुथूट फिनकाॅर्प लिमिटेडच्या कराड शाखा आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास कराडकर नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कोल्हापूर नाका येथील संजीवन हॉस्पिटलच्या मदतीचे बळ मिळाले. या नेत्र तपासणी शिबिरात शहरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मुथूट फिनकाॅर्पच्या कराड शाखेत डाॅ.योगिता पाटील यांचे स्वागत करताना शाखाप्रमुख जास्मिन काझी समवेत कल्याणी माने... मुथूट फिनकाॅर्प लिमिटेड (मुथूट ब्ल्यू) च्या कराड शाखेमार्फत ग्राहकांच्या सेवेबरोबर विविध समाज उपयोगी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. याच भावनेतून कोल्हापूर नाका येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये डाॅ. योगिता पाटील यांच्या सहकार्याने या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संस्थेमार्फत असे उपक्रम नेहमीच राबवले जातील असा विश्वास मुथूट फिनकाॅर्प कराड शाखाप्रमुख जास्मिन काझी यांनी यावेळी व्यक्त केला. समाजात व्...

कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे शारदीय व्याख्यानमालचे आयोजन...

Image
  कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे शारदीय व्याख्यानमालचे आयोजन... कराड दि.23-नवरात्र उत्सवात नगरपरिषदेच्या नगर वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. सन १९३२ पासुन ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु असुन यंदा ही व्याख्यानमाला ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात २६ सप्टेंबर पासुन या शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. कराडचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ म्हणुन या व्याख्यानमालेने नावलौकीक मिळविला आहे. १६५ वर्षाची परंपरा जपणारे हे नगरवाचनालय आज कराड शहराची शान भरली आहे. बुध्दीवंतांची गरज तर वाचनवेडया पुस्तकप्रेमी, वाचकप्रेमी, वाचकांची तहान भागविण्याचा झरा बनली आहे. या वाचनालयाची स्थापनाच १८५७ ची, हे वर्षच मुळात अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष. या १८५७ मध्ये स्थापन झालेले हे नगरवाचनालय आजही आपल्या अखंड सेवेने, तत्परतेने विविधतेने, वाचकांची जिज्ञासूंची, अभ्यासूंची व्याख्यानमाला रसिकांची भूक भागविते आहे. या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला राजकारण काव्य, कथाकथन, धार्मीक, ...

सातारा जिल्ह्यात आज कोरोना बाधितांची पून्हा मोठी वाढ;सक्रीय रूग्णसंख्येत वाढ.........

Image
सातारा जिल्ह्यात आज 14 बाधिताची वाढ ... कराड दि.22 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 14 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 55 झाली असून सध्या 6 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.  सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-0,  खंडाळा- 0, खटाव- 0, कोरेगाव-2, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-7, वाई-3, इतर 1 असे 14 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी-226 (एकूण-26 लाख 21 हजार 507) आज बाधित वाढ- 14 (एकूण-2 लाख 80 हजार 610) आज कोरोनामुक्त- 8 (एकूण-2 लाख 73 हजार 817) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 719) उपचारार्थ रूग्ण-55 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -6 सातारा जिल्ह्यात आज  10 जनावरांचा मृत्यु झाला ..... सातारा जिल्ह्याकडे 2 लाख 81 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून यांमधुन आजअखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये 1 लाख 11 हजार 928 व  इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये 18 हजार 325 असे एकूण 1 लाख 30 हजार 253 पशुधनाचे लसीक...

सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमणार....

Image
  सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमणार.... मुंबई दि.21-सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सफाईगार व मेहतर हे अनुसूचित तसेच इतर जातीतील असतात.  त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीच्या तसेच कामाच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध समित्या नेमल्या होत्या.  या कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या होत्या. या समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय आज घेण्यात आला

कराडात ज्यांच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्यास 500 रूपयांची दंडात्मक कारवाई होणार.....

Image
डेंग्यू,चिकनगूनिया उपयोजनेत शहर परिसरात औषध फवारणी करताना नपा कर्माचारी... कराडात ज्यांच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्यास 500 रूपयांची दंडात्मक कारवाई होणार.....  कराड दि.21 (प्रतिनिधी) कराड शहरात डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने नियमित कीटकनाशक फवारणी सुरू ठेवली असून अनेक ठिकाणी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनुसार आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रीनी टीम घरोघरी डेंगू बाबत जनजागृती करीत आहेत. अशा परिस्थितीत कराड शहरात ज्यांच्या घरी डेंगूच्या आळ्या सापडतील त्यांच्यावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कराड नगर परिषदेने नागरिकांसाठी कचरा गाड्या तसेच स्पीकर वरून डेंगू व चिकनगुनिया संदर्भात सूचना व जनजागृती करण्यास यापूर्वी सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काही सूचना नागरिकांना केल्या असून त्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या घरात झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा तसेच पाण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून प...