पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून लोककलावंतांची विचारपूस....
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून लोककलावंतांची विचारपूस.... कराड दि.23-करवडी ता.कराड येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमप्रसंगी राज्यभर लोकप्रिय असलेल्या लोककलावंत श्रीमती मंगला बनसोडे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली, यावेळी ना. पाटील यांनी त्यांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली व शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या काळात इतर क्षेत्राप्रमाणेच लोककलावंतांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता, अशा परिस्थितीतदेखील राज्यातील महाविकास आघाडी सरकार कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, भूस्खलन होऊन जीवित हानी झाली, त्यावेळी देखील ना. पाटील यांनी संवेदनशीलता दाखवून, 4-5 किलोमीटरचा पायी चिखल तुडवत घटनास्थळी भेट देऊन पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकत्व सिध्द केले. आता परिस्थिती पूर्वपदावर येवू लागली आहे. परंतु कोरोना महामारीच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार कलावंताचे मागे खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल श्रीमती मंगला बनसोडे यांनी ना. पाटील व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले, व कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान लो...