कृष्णाकाठचे भगीरथ : जयवंतराव भोसले (आप्पासाहेब)
कृष्णाकाठचे भगीरथ : जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) सहकार, आरोग्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रामध्ये कराड येथील कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळेच त्यांना कृष्णाकाठचे भगीरथ म्हटले जाते. आदरणीय आप्पासाहेबांचा जन्म २२ डिसेंबर १९२४ रोजी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता समाज हा सध्याच्या विकसनशीलतेच्या खूप मागे होता. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सुपीक जमीन, मुबलक पाणी या सर्व गोष्टी असूनही सामाजिक प्रगती झालेली नव्हती. याचे मुख्य कारण होते, योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाचा अभाव! अशा प्रतिकूल परिस्थितीत आप्पांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे शिक्षण घेतलेले असतानाही वकिली व्यवसाय न करता त्यांनी प्रगतशील शेतकरी होणे पसंत केले. म्हणतात ना डोक्यात नवनिर्मितीचे विचार असणारे व्यक्तिमत्त्व कधी शांत बसत नाही. त्यांनी १९५२ च्या दरम्यान सहकार चळवळीमध्ये सहभागी होऊन आपले आयुष्य हे सामाजि...