कराड तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व; मा. अजित थोरात (काका)
आमचे मित्र आमचे चेअरमन ; मा. अजित थोरात (काका) मा. अजितजी काका थोरात यांचा वाढदिवस आज साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. मा. अजित काका ज्योतीराम थोरात थोरात, मलकापूर कराड तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व. बीएपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शालेय जीवनामध्ये व महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला. सामाजिक कार्यासोबत शेतीची आवड जोपासली. शेतीमध्ये त्यांनी चांगली बैल जोडी पाळण्याचा छंद जोपासला. आजही त्यांच्याकडे उत्तम बैल जोडी आहे. मळाई ग्रुप मध्ये काम करीत असताना मळाई ग्रुप मधील श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, आदर्श जुनिअर कॉलेज व चव्हाण विद्यालय, मलकापूर, आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले, श्रीमती कन्या शाळा मलकापूर, न्यू इंग्लिश स्कूल कासार शिरंबे, स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर, आदर्श प्राथमिक विद्यालय आ.नगर, जमना सहकारी ग्राहक संस्था मलकापूर, आदर्श क्रीडा संस्था कराड, कराड तालुका ॲमयुचर अथलेटिक असोसिएशन कराड, समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर, ...