रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी : उमेश चव्हाण
कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते रुग्ण हक्क परिषदेचे श्री उमेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी : उमेश चव्हाण माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने व्याख्यान. कराड, दि. 28 (प्रतिनिधी) : डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील पद असून, धर्मादाय हॉस्पिटल अथवा चॅरिटेबल ट्रस्टचे चालक हेच महत्वाचे असतात. धर्मादाय हॉस्पिटल व चॅरिटेबल ट्रस्टचे दवाखाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत असतात. याची माहिती आपणास नसल्याने आपण अज्ञानपणाने त्या हॉस्पिटलच्या पिळवणूकीला बळी पडतो. याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी. असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात माजी खासदार (स्व.) प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे तसेच रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (स्व.) प्रेमीलाताई चव्हाण चॅरि...