समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे - पृथ्वीराज चव्हाण
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे - पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 12 (प्रतिनिधी) - ज्या देशात महिलांचा अर्थव्यवस्थेत वाटा राहील त्याचवेळी तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. मानसी दिवेकर या व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं. स. सदस्य नामदेवराव पाटील, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा गीतांजली थोरात, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, सत्यजित ग्रुप च्या संचालिका भाग्यश्री पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण आदी सह कराड दक्ष...