Posts

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; कोयना धरणात पाणीसाठा वाढला...

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; कोयना धरणात पाणीसाठा वाढला... कराड दि.1 (प्रतिनिधी) जिल्ह्यात मान्सूनने जोर धरला नसला तरी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कोयना, नवजा सह महाबळेश्वर येथे सध्या पाऊस सुरू आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 72 मिलिमीटर, नवजा येथे 97 तर महाबळेश्वर येथे 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 20.04 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे. धरणातून 11 हजार 943 क्यूसेक्स आवक सुरू आहे  आज सकाळी 8 वाजेपर्यंत... कोयना-72 मिलिमीटर (843) नवजा-97 मि.मी.(1072) महाबळेश्वर-155 मि.मी.(863) गत वर्षी आजच्या दिवसी धरणात 11.95 टी एम सी पाणी साठा होता.. गत वर्षी कोयना-83 मिलिमीटर (404) नवजा-110 मि.मी.(539) महाबळेश्वर-128 मि.मी.(723)

‘कृष्णा’त पत्नीने पतीला; वडिलांनी मुलाला दिले जीवदान!

Image
कराड : यशस्वी किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना व किडनी दात्यांच्या डिस्चार्जप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले...  ‘कृष्णा’त पत्नीने पतीला; वडिलांनी मुलाला दिले जीवदान! कृष्णा हॉस्पिटलमध्ये २ रुग्णांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण; रुग्ण व दात्यांना डिस्चार्ज कराड, दि. २७ : कराड येथील एका सहकारी पतसंस्थेत नोकरी करणाऱ्या ४३ वर्षीय रुग्णावर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सेंट्रींग काम करुन आपली गुजराण करणाऱ्या एका ३८ वर्षीय रुग्णावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. कराड येथील रुग्णाला त्याच्या पत्नीने; तर कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णाला त्याच्या ६२ वर्षीय वडिलांनी किडनी दान करुन जीवदान दिले. या रुग्णांना आणि किडनी दात्यांना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.  कराड शहरालगत एका गावामध्ये राहणारे ४३ वर्षीय कैलास (नाव बदलले आहे) एका सहकारी पतसंस्थेत नोकरी करतात. गेल्या वर्षभरापासून त्यांना मळमळ, उलट्या, जास्त प्रमाणात चक्कर येणे, वजन कमी होणे असा त्रास होऊ ल...

सहा पदरीकरणाच्या नियोजनशून्य कामावर पृथ्वीराज चव्हाण भडकले...

Image
  महामार्गाच्या नियोजनशून्य कामावर आ. पृथ्वीराज बाबा भडकले... महामार्गावरील वाहतूक समस्या गांभीर्याने घेण्याबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना... कराड दि.22: पुणे बेंगलोर महामार्गावर दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक जाम झाली होती. याबाबत दक्ष कराडकर या सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन याबाबत माहिती दिली होती. दरम्यान या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्राफिक परिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी करून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कराड शासकीय विश्रामगृह येथे हायवेच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली. यावेळी NHAI (एन एच ए आय) चे प्रोजेक्ट प्रमुख पंधरकर यांना दूरध्वनीद्वारे हायवेच्या कामाची परिस्थिती सांगून पावसाने महामार्गांवर पाणी साचल्याने कशा प्रकारे ट्राफिक समस्या उद्भवते याची माहिती देत हायवेच्या नियोजनशून्य कामावर संताप व्यक्त केला.  हायवेच्या नियोजनशून्य कामामुळे सामान्य नागरिकांना पहिल्या पावसातच समस्येला सामोरे जावे ...

कराडात उद्या बकरीद ईदची सामुदायिक नमाज होणार नाही...

Image
  कराडात उद्या बकरीद ईदची सामुदायिक नमाज होणार नाही... कराड दि.17 (प्रतिनिधी) शहरात सायंकाळी पावसाने सुरुवात केल्याने कराडच्या ईदगाह मैदानावर बकरीद ईद निमित्त होणारी सामुदायिक नमाज (प्रार्थना) होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहर व परिसर तसेच ग्रामीण भागातील मूस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर येऊ नये असे आवाहन शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह कराड कडून करण्यात आले आहे. कराड शहर तसेच ग्रामिण भागातील सर्व मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर न येता आपआपल्या नजीकच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करावी. पावसाचे वातावरण असल्यामुळे सोमवार दि. 17 जून रोजी ईद उल- अजहा (बकरीद ईद) ईदची नमाज "ईदगाह" मैदानावर होणार नाही. त्यामुळे मूस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर येण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती सर्व मुस्लिम बांधवाना शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह,कराड यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या सामुदायिक नमाज पठनासाठी शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह व कराड नगरपरिषदे कडून गेली दोन दिवस इतका मैदानावर तयारी करण्यात आली. मैदानावरील कचरा साफ करून तसेच गवत काढून आज रेषा ही आखण्यात आल्या होत्या. मात्र द...

रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले यांची निवड ;सेक्रेटरीपदी रो आनंदा थोरात...

Image
रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले यांची निवड ;सेक्रेटरीपदी रो आनंदा थोरात... कराड दि.16 : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले आणि सेक्रेटरी पदी रो आनंदा थोरात यांची निवड झाली आहे. रोटरी वर्ष 2024 - 25 साठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ कराडच्या संचालक मंडळात व्हाईस प्रेसिडेंट रो रघुनाथ डुबल, जॉइंट सेक्रेटरी रो शुभांगी पाटील, ट्रेजरर रो किरण जाधव, क्लब ट्रेनर म्हणून रो गजानन माने आणि रो विनायक राऊत यांची सार्जंट आर्म म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी विविध कमिटी चे चेअरमन व पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू , जालना यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये सामाजिक काम होणार आहे. या डिस्ट्रिक्ट मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये जवळपास 91 क्लब येतात. रोटरी क्लब ऑफ कराडचे हे 68 वे वर्ष आहे. आज अखेर रोटरी क्लब कराडने कराड आणि कराडच्या परिसरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कामे केली आहेत. रोटरी वर्ष सन ...

मलकापूर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निर्मला वीर तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड...

Image
मलकापूर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निर्मला वीर तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड... कराड दि.14 मलकापूर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निर्मला वीर तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय नवीन वर्षाच्या कार्यकारणी संचालकपदी आय पी पी पूजा वखारिया, उपाध्यक्षपदी वैशाली पाटील, खजिनदार छाया शेवाळे,  संपादक वैशाली लक्ष्मण पाटील तसेच सी. सी. प्रमोदिनी मोहिते सल्लागार समितीमध्ये सुनीता यादव, वैदेही कुलकर्णी, स्मिता औंधकर, संजीवनी यादव, अंजना जाधव, पल्लवी पाटील यांची निवड करण्यात आली. इनरव्हील ही संस्था जागतिक स्तरावर ती काम करणारी संस्था आहे. ही संस्था समाजातील वंचित घटकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. या संस्थेला शंभर वर्षाचा इतिहास असून फक्त महिला ही संस्था चालवतात. इनरव्हील क्लब मलकापूरने विविध सामाजिक कामे आज पर्यंत केलेली आहेत. कोयना नगर, आंबेगाव लँड स्लाइडिंगला मदत करण्यात आली. वेश्या वस्तीमध्ये रक्षाबंधन दिवशी विविध उपक्रम करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच ऊसतोड कामगार महिलांसाठी काम केले. जिथे बिल्डिंगची काम चालू असतात व बरेच ब...

कराडच्या सोमनाथ सूर्यवंशी टोळीवर मोक्काची कारवाई; अमोल ठाकूर....

Image
कराड शहरातील कुख्यात गुन्हेगार व त्याचे साथीदार यांचेविरुध्द मोक्का अंतर्गत दोषारोपपत्राला अपर पोलीस महासंचालक यांची मंजुरी. कराड दि.12-हजारमाची ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सूर्यवंशी व त्याच्या दोन साथीदारावर मोका अंतर्गत कारवाई केल्याची माहिती कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.सुर्यवंशी याचेविरुध्द यापुर्वी कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीने असे असे एकुण मिळुन १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, जुगार, अपहरण, सरकारी नोकरांवरील हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगलेवावत इ. गुन्हयांचा समावेश असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक यांनी सातारा जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यापासुन अनेक मोठया गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उभारुन सातारा जिल्हयातील गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये शहर व परिसरातील अनेक गुन्हेगार पोलीस विभागाचे हिटलिस्टवर आहेत. त्यापैकीच एक सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी (टोळी प्रमुख) व त्याचे दोन साथीदार रविराज...