कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामे गंभीर बाब;स्वाती पांडे...
कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामे गंभीर बाब;स्वाती पांडे... एमएडीसीच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे यांनी व्यक्त केली चिंता; विमानतळाची केली पाहणी... कराड दि 8 (प्रतिनिधी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे व अपर जिल्हाधिकारी बी दीपक नलवडे यांनी आज कराड विमानतळास भेट देऊन पाहणी केली. विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पाहणी केली. मात्र विमानतळ परिसरात वाढणारी अनधिकृत बांधकामे पाहता त्यांनी गंभीर चिंता व्यक्त करत विमानतळ परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कलर कोडेड झोनिंग मॅपची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश दिले. कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड विमानतळाचे व्यवस्थापक कृणाल देसाई, प्रभारी गटविकास अधिकारी विजय विभुते, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान व्यवस्थापक कृणाल देसाई, अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे संचालक परवेज दमानिया, बेस इन्चार्ज पंकज पाटील, नितेश तिवारी, सीएफओ देशराज यांनी स्वाती पांडे यांचे स्वागत केले. कराड विमानतळ विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे 221 कोटी रुपयांचा...