Posts

कराडच्या त्या स्फोटातील जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू...

Image
  कराडच्या त्या स्फोटातील जखमी महिलेचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू... . राजू सनदी, कराड  कराड दि.31 (प्रतिनिधी) येथील मुजावर कॉलनीत आठ दिवसापूर्वी शरीफ मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेल्या पैकी सुलताना मुल्ला (वय 33) या महिलेचा येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 25 ऑक्टोंबर रोजी मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळी अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांचे नुकसान झाले. याशिवाय सहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या स्फोटामुळे तीन घरातील सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. हा स्पोट झाल्यानंतर सातारा पुणे व अन्य ठिकाणाहून फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या हा स्फोट नेमका कशाने झाला याची अद्याप माहिती संबंधित प्रशासनाने जाहीर केली नव्हती मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला होता. या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या घरातील दोन लहान मुलासह त्यांच्या पत्नी व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते. या जखमीवर करा...

काले गावच्या हद्दीत एसटी दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू...

Image
काले गावच्या हद्दीत एसटी दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू... कराड दि. 31 (प्रतिनिधी) कराड उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. घटनास्थळावर वाहतूक विस्कळीत झाली असून नांदगाव आ.पोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुचाकी वरील इसम धोंडेवाडी येथील असून चंद्रकांत भोसले (वय 50) असे त्यांचे नाव आहे. दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करत असताना कराड कडे येणाऱ्या कराड आगाराच्या एसटीची धडक बसून दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघात कालेगावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या चौकात झाला आहे.

रेठरे बुद्रुक येथे सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला...

Image
रेठरे बुद्रुक येथे सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांच्यावर  हल्ला... रेठरे बुद्रुकच्या गावाच्या नावलौकिकाला गालबोट लावणारी घटना.. . कराड दि.29-रेठरे बुद्रुक गावाची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून सरपंच पद खुल्या प्रवर्गाला जाहीर झाले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून गावात सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. यावेळी कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय (आबा) अशोकराव सूर्यवंशी  तसेच अतुल भोसले गटाचे उमेदवार हणमंत बाबुराव सूर्यवंशी या दोन सख्ख्या चुलत्या पुतण्यात हाय व्होल्टेज लढत होताना दिसून येत आहे.  अशा परिस्थितीत भोसले गटाचे समर्थक हेमंत पांडुरंग धर्मे यांनी सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना रेठरे बुद्रुक येथील बालाजी नगर परिसरात प्रचार करताना फिरत असताना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी उमेदवार आबा सूर्यवंशी यांनी गावाच्या विकासासाठी अशा धमकींना बळी पडणार नाही व हुकूमशाहीला प्रतिकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे म्हणत प्रचार चालूच ठेवला व साथीच्या उमेदवारां...

कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला...

Image
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला... कराड दि.28- कोयना धरण परिसरात गेल्या १२ दिवसात तिसऱ्यांदा भूकंपाचा धकका जाणवला असुन आज रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण परिसर हादरला आहे. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून साडेनऊ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आज रात्री झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून साडेनऊ कि मि अंतरावर गोषटवाडी गावच्या हद्दीत साडेसात किलोमीटर खोलीवर होता. अशी माहिती संबंधित भूकंप मापन केंद्रातून देण्यात आली.

कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून बोगस नंबरप्लेटची चोरीची बुलेट ताब्यात...

Image
कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून बोगस नंबरप्लेटची चोरीची बुलेट ताब्यात... कराड दि.28- शहरात नियमित वाहतूकीच्या कामासंदर्भात कामकाज सुरू असताना संशयस्पद आढळून आलेल्या मोटरसायकलची चौकशी केली असता संबंधित मोटरसायकल चोरीची निघाली असून त्या संदर्भात कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार अमोल तातोबा पवार यांना तसेच होमगार्ड जंगम यांना शुक्रवारी कराड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमण्यात आले होते. सदर वेळी वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत असताना संबंधित अमलदार यांनी समोरून येणारे ब्लॅक कलरची बुलेट वरील चालक यांना इशारा करून बाजूला घेतले, सदर चालकास त्याचे नांव व बुलेट बद्दल, तसेच तिचे कागदपत्राबाबत माहिती विचारली असता सदर चालक याने आपले नाव सलीम ईलाही डांगे वय 48 वर्षे, व्यवसाय वाहन खरेदी-विक्री रा. मसुर, जि सातारा असे सांगून बुलेटबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बुलेट चारीची असावी असा संशय निर्माण झालेमुळे सदर बुलेट बाबत आरटीओ कार्यालय, कराड येथून पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली असता, सदर ब...

स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हाॅल नगरपरिषदेच्या ताब्यात; निविदा काढून नागरिकांसाठी वापरात आणणार...

Image
  स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हाॅल नगरपरिषदेच्या ताब्यात; निविदा काढून नागरिकांसाठी वापरात आणणार... कराड दि.27- कोविड सेंटरसाठी वापरण्यात आलेला यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल संबंधित विभागाकडून अखेर तीन वर्षानंतर नगरपरिषदेकडे सुपूर्द झाला आहे. त्यामूळे नगरपरिषदेने हॉलची स्वच्छता व दुरुस्ती करून ते वापरात आणण्याची तयारी सूरू केली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण नगरपरिषदेत आल्यानंतर नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर हा हॉल प्रांताधिकारी यांनी नगर परिषदेच्या ताब्यात दिला असून आता हा प्रशस्त हॉल नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी दिली. सदर हॉल गेली तीन वर्षहून अधिक काळ कोविड सेंटरसाठी वापरण्यात आला होता. या काळात नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. सप्टेंबर 2020 मध्ये या हॉलचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये केल्यानंतर पहिल्या लाटेत काही काळ हाॅलचा वापर झाला. मात्र दुसऱ्या लाटेत या हॉलचे रूपांतर संपूर्णपणे कोविड हॉस्प...

सातारा रत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित...

Image
  सातारा रत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित... कराड, दि.२६: मुंबई येथील आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय, के.ई.एम.रुग्णालय, परळ, मुंबई येथील सिनियर असिस्टंट प्रोफेसर, स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूती शास्त्र तज्ञ व एंडोस्कोपिक सर्जन डॉ.सुनील एकनाथ तांबवेकर यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.सुनील तांबवेकर हे मुळचे घोगाव, ता.कराड येथील रहिवासी आहेत. सातारा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. दादर येथील शिवाजी मंदिर येथे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद् घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सेवागिरी संस्थान पुसेगाव महंत सुंदरगिरी महाराज, प्रा.यशवंत पाटणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम, माजी आमदार आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबुराव माने, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.सुभाष ...