कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून दमदार कामगिरी; महिन्याभरात वीस लाखांचा दंड वसूल...
कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून दमदार कामगिरी; महिन्याभरात वीस लाखांचा दंड वसूल... कराड दि.8 (प्रतिनिधी) कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून गत महिन्यात शहर व परिसरात दमदार कामगिरी करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाकडून महिन्याभरात वीस लाख 57 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरात, कॉलेज परिसर विद्यानगर,भाजी मंडई व प्रीतीसंगम घाट या ठिकाणी विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त mv act प्रमाणे ट्रिपल सीट, मोबाईल वर बोलणे, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने जाणे, सीट बेल्ट, नो पार्किंग, दुचाकीच्या सायलेन्सर मध्ये बदल करणे अशा स्वरूपाच्या एकूण 3 हजार 315 केसेस करून 20 लाख 57 हजार 200 रुपये दंड केला आहे. तसेच वाहतुकीस अडथळा तसेच दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रोडवर धोकादायक रीतीने वाहने उभे करणाऱ्या वाहन चालकांवरती आयपीसी कलम 283 प्रमाणे 56 गुन्हे दाखल करून पुढील कारवायासाठी कोर्टात पाठवण्यात आले ...