खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोकसभा मतदारसंघासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर...
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर... कराड :दि.18-खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी १ कोटी ६३ लक्ष रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंदिस्त गटर बांधणे, अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे अशी कामे मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजने अंर्तगत सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या १८ विकास कामांच्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आरे तर्फ परळी येथे शाक्य नगरमध्ये समाजमंदिर बांधणे ७ लाख, शिवथर येथे बौद्धवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, जावली तालुक्यातील सायगाव येथे सारनाथ नगरमध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे व बंदिस्त गटर बांधणे १० लाख, बिभवी येथे बौद्धवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, पाटण तालुक्यातील ठोमसे येथे बौद्धवस्तीत आरसीसी गट...