यशराज देसाई लिखित ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन....
यशराज देसाई लिखित ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन.... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न.. . मुंबई दि.17: महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी लिहिलेल्या ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी विधानभवनातील समिती कक्षात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आजच्या डिजिटल युगातील मानवी जीवनातील आव्हांनाकडे तत्त्वज्ञानात्मक प्रश्न म्हणून पाहात सकारात्मक दिशा दाखवणाऱ्या या पुस्तकाबद्दल श्री. देसाई यांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले. स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून श्री. देसाई यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्यातील अभ्यासू व विचारशील नेतृत्वाची ओळख पाटण तालुक्यास झाली आह...