Posts

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

Image
  नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन मुंबई दि.24 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा - महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. या मतदारसंघात आत्तापर्यंत केवळ तीनच लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असून, हे तिघेही लोकप्रतिनिधी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिले आहेत. यापैकी गेल्या १० वर्षांपासून या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा या निवडणुकीत भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ३९,३५५ मतांनी पराभव करत देदीप्यमान विजय संपादन केला. या ऐतिहासिक विजयात कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविण्यात यशस्वी झालेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर राज्यभरातून कौतुकाच

मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

Image
  मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण कराड, दि.23 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्थ आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले. त्या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार आहे.  या निवडणुकीत अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन, ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करतील त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल.  राज्यात श्री. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे, त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ते राज्याच्या विकासाकरिता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील हि अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा  ज्या प्रमाणे २०१९ मध्ये भाज

कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल

Image
  कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल दक्षिणची रत्नागिरी गोडाऊन तर उत्तरची मतमोजणी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे होणार कराड, दि. २२ (प्रतिनिधी) - कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सकाळी 6 वाजता सुरू होत आहे. त्यामुळे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजे पर्यत शहरातील वाहतुक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.  कराड दक्षिणची रत्नागिरी गोडाऊन येथे मतमोजणी असल्याने विजय दिवस चौक येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (एस.टी. बस वगळून) प्रवेश बंद करणेत आला असून, सदरची वाहने विजय दिवस चौक येथुन दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापुर नाका बाजुकडे जातील. तसेच एस.टी. बस ही विजय दिवस चौक येथुन टी पॉईन्ट मार्गे एस.टी. स्टॅन्ड येथे व त्याच मार्गे परत बाहेर येतील. कार्वेनाका बाजुकडुन भेदा चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गेट नं. ४ येथुन भेदा चौक बाजुकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे, सदरची वाहने गेट नं.४ येथुन बैलबाजार रोड, मलकापुर, हायवे रोड मार्गे कराड शहरात जातील. पोपटभाई पेट्रोल पंप येथुन भेदा चौक बाजुकडे

कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर...

Image
  कार्वे : येथील जाहीर सभेत बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समोर उपस्थित जनसमुदाय कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर... कराड, दि. १८ (प्रतिनिधी) : मतदारांचे दुःख व त्यांच्या विकासाच्या मागणीवर टिक करून काम करतो, तो लोकप्रतिनिधी हवा. पृथ्वीराजबाबा कोण व काय आहेत. हे जाणून घ्यायचे तर १९८०च्या दशकात अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संगणकाचा शोध लावला. त्यांनी संगणकामध्ये इंग्रजीशिवाय दुसरी भाषा येवू शकत नाही, असा दावा केला. परंतु पृथ्वीराजबाबांनी संगणकामध्ये देव नागरी भाषा आणून क्रांती केली. आणि असा बुद्धिमान प्रतिनिधी कराड दक्षिणचा आहे. हे भाग्य जपण्यासाठी कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही. आणि कामाच्या माणसाला निवडून आणल्याशिवाय राहत नाही. असे सांगून पृथ्वीराजबाबा निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष होतील. अशावेळी सरकारच्या तिजोरीतून खाली पडलेला ढिगारा कराड दक्षिणमध्ये सरायचा नाही. त्यासाठी विकास निधीची काळजी कशाला करताय. २८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मु

कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी मला संधी द्या;डॉ.अतुलबाबा भोसले

Image
काले येथिल जाहीर सभेत बोलताना डॉ.अतुलबाबा भोसले   दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी मला संधी द्या;डॉ.अतुलबाबा भोसले कराड दि.18 : कराड दक्षिणमधील माता-भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी काम करण्याची मला संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपा – महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. काले (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.  भाजपा – महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ काले येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, गणपतराव हुलवान, सुलोचना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, विद

आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट

Image
कराड : येथील काँग्रेस महाविकास आघाडीच्या सांगता सभेत बोलताना खा. सचिन पायलट, समोर उपस्थित जनसमुदाय.. आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट कराड, दि.17 (प्रतिनिधी) : छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने सतत फुगते. असे सांगून राजस्थानचे काँग्रेसचे नेते व खा. सचिन पायलट म्हणाले, भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू आहे. हे पाहून जनतेचा विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीराजबाबांना तुम्ही आजपर्यंत अनेकदा निवडून दिले आहे. कराडची जनता सौभाग्यशाली आहे, की असा सभ्य व अंगावर कोणताही डाग नसणारा हा नेता आहे. पृथ्वीराजबाबांनी मान, सन्मान आणि पदे मिळवली. व त्यातून तुमची मान कोणासमोर झुकू दिली नाही. अशा स्वाभिमानी नेत्याला विजयी करा. व जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर द्या. असे आवाहन खा. सचिन पायलट यांनी कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकात झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या विराट सांगता सभेत केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कर

अतुलबाबाना निवडून देण्याचा माजी सैनिकांचा निर्धार....

Image
  अतुलबाबाना निवडून देण्याचा माजी सैनिकांचा निर्धार माजी सैनिक व कुटुंबियांचा वाठार येथे भव्य मेळावा   वाठार, दि. 17 (वार्ताहर) भाजपा सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळवून दिली आहे. देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी सज्ज असलेल्या आजी – माजी सैनिकांच्या हितासाठी त्यांनी अनेक कल्याणासाठी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपा-महायुतीचे सरकार आणण्यासाठी कराड दक्षिणमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी वाठार येथे आयोजित भव्य मेळाव्यात केला. भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ वाठार (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम, एस. ए. माशाळकर, व्ही. वाय. चव्हाण, निवृत्त सुभेदार नागेश जाधव, निवृत्त कर्नल महादेव काटकर, ‘मेस्को’चे मोहिते, जयराम स्वामी मठाचे विठ्ठलस्वामी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता